टॉप पोस्टमनोरंजन

Gold Teaser:- अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’चा नवीन टीझर तुमच्या मध्ये देशभक्तीची भावना निर्माण करेल

0

अक्षयकुमारचे एकामागोमाग एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतच चालेले आहेत. आता त्यामध्ये 15 आॅगस्टला रिलीज होणाऱ्या ‘गोल्ड’चा देखील समावेश होणार आहे. ‘गोल्ड’चा नवीन टीझर रिलीज झाला असून, यामध्ये अक्षयकुमार पुन्हा एकदा देशभक्ती विषयी बरचं काही सांगून जात आहे.

‘गोल्ड’ हा हाॅकीवर आधारीत चित्रपट असून यामध्ये अक्षयकुमार हाॅकी कोचच्या भुमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटातून ‘नागीण’ सिरीयलमधील मोनी राॅयदेखील बाॅलीबूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Loading...

या चित्रपटात भारताने स्वातंत्र्यानंतर हाॅकीमध्ये पहिल्यांदाच जिकंलेल्या गोल्ड विषयीची गोष्ट सांगण्यात आली आहे.  ही कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यावरील बायोपिक नसून भारताने 1948, 1952 आणि 1956 हाॅकीमध्ये जिंकलेल्या गोल्डची ही कहानी आहे.

टीझरच्या सुरूवातीलाच ब्रिटनचे राष्ट्रगीत वाजवले जाते व 200 वर्ष या राष्ट्रगीतावर उभे राहून तुम्हाला कसे वाटले असा प्रश्न केला आहे व त्यानंतर लिहून येते की, एकट्या माणसाने ब्रिटिशांना भारतीय राष्ट्रगीतावर उभे राहिला लावले.

या चित्रपटात अक्षयकुमार बरोबर कुणाल कपूर, विनीत कुमार सिंग, अमित साध आणि सनी कौशल सुध्दा दिसणार आहे.

या चित्रपटाला रिमा कागतीने डायरेक्ट केले आहे. या आधी तिने आमीर खानचा ‘तलाश’चे डायरेक्शन केले आहे, तर ‘जिंदगी ना मिलेगी ना दोबारा’ व ‘दिल धडकने दो’ या सारख्या चित्रपटांचे पटकथा लेखन केले आहे.  रितेश सिंधवानी व फरहान अख्तर यांनी हा चित्रपटाचे प्रोडक्शन केले आहे.

हा चित्रपट येत्या 15 आॅगस्टला सर्वत्र रिलीज होणार आहे.

 

(PHOTO INPUT : – YOUTUBE)

Loading...

VIDEO : व्हॉट अ् मोमन्ट ! जिंकलेली ट्राॅफी घेताना रहाणेने अफगाणिस्तानच्या खेळाडूना देखील केले निमंत्रित

Previous article

Column : करामती ‘मोदी अॅंड सन्स’

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *