मुख्य बातम्या

आता तरी दार उघड भावा दार उघड ; विरोधकांची मुख्यमंत्री ठाकरेंवर सडेतोड टीका

0

आज मुंबईत  रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले, वरळी, प्रभादेवी, हिंदमाता, अंधेरी, मालाड, कांदिवली याठिकाणी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले, रस्ते जलमय झाले तर वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली. मुंबईच्या पावसाने सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत केले.

संततधार पावसात मुंबईकरांची परवड. महापालिका मख्ख, राज्य सरकार ढिम्म, मुंबईकर बेहाल…
दार उघड भावा दार उघड…@OfficeofUT pic.twitter.com/ZaAw5LNimt
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 23, 2020

तर मुंबईच्या पूरसदृश्य परिस्थितीवरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले.
महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. संततधार पावसात मुंबईकरांची परवड. महापालिका मख्ख, राज्य सरकार ढिम्म, मुंबईकर बेहाल त्यासाठी दार उघड भावा दार उघड अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आता तरी दार उघड भावा दार उघड ; विरोधकांची मुख्यमंत्री ठाकरेंवर सडेतोड टीका InShorts Marathi.

शिवसेनेनं करून दाखवलचं , मुंबईची तुंबई केली ; प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

Previous article

महत्वाची बातमी : :मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत ‘हे’ १५ ठराव मंजूर !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.