मुख्य बातम्या

आता पुण्यातील कोरोनाचा भार हिरकणींच्या खांद्यावर !

0

‘आई… आमच्या वाढदिवसाला आम्हाला कोणतेही गिफ्ट नको. पण, एक दिवस…फक्त एक दिवस आमच्या सोबत रहा ना.तु किती दिवस आम्हाला जवळ घेतलं नाहीस.’ ही आर्त हाक आहे पालिकेच्या कोविड सेंटरवर काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या चिमुकल्यांची. काळजाचा ठाव घेणारे हे शब्द ऐकून डोळ्यात टचकन पाणी उभे राहिल्यावरही ही माऊली कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी धाव घेते. अशा एक नाही तर तब्बल दहा महिला डॉक्टर अधिकारी पालिकेच्या दहा कोविड सेंटरची धुरा वाहात आहेत. कोरोना रुग्णांची आईच्या मायेने सेवा करणाऱ्या या ‘हिरकणी’ आघाडीवर कोरोनाशी लढा देत आहेत.
पुणे महानगरपालिकेने शहरात एकूण चौदा कोविड सेंटर उभारलेले आहेत. या चौदा सेंटरपैकी दहा सेंटरवर महिला डॉक्टर अधिकारी काम करीत आहेत. यामध्ये अवघ्या ५० खाटांच्या सेंटरपासून ते १२०० खाटांच्या सेंटरपर्यंतचा समावेश आहे. आपल्या कुटुंबाच्या पाठबळावर आणि सेंटरमधील नर्स व अन्य वैद्यकीय कर्मचा-यांच्या सोबतीने या हिरकणींनी आजवर हजारो कोरोना बाधित रुग्णांना ठणठणीत बरे करुन घरी धाडले आहे. एकीकडे रुग्णांना बरे करण्याचे असलेले आव्हान आणि दुसरीकडे आपल्यामुळे कुटुंबियांना बाधा होऊ नये याची असलेली धास्ती, वरिष्ठांच्या अपेक्षा, राजकीय अपेक्षा आणि दबाव अशा अनेक आघाड्यांवर काम करतानाच या महिला डॉक्टरांसमोर स्वत:चे मानसिक स्वास्थ्य टिकविणे हे सुद्धा एक आव्हानच आहे. घरी वेळ देता येत नाही की स्वत:साठी वेळ काढता येत नाही.
कोरोनामुक्त झाल्यावर नागरिकांच्या डोळ्यात समाधानाचे तरळत असलेले अश्रू आणि चेह-यावरील हास्य हेच आमच्या कामाचे बळ असल्याचे या महिला डॉक्टरांनी सांगितले. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. या भयग्रस्त परिस्थितीमध्ये एकमेकांच्या मदतीचीही अपेक्षा करणे फोल ठरत असतानाच आपले कौटुंबिक जीवन बाजूला ठेवून ‘फ्रंटफुट’वर या महिला लढत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

तुकाराम मुंढे असताना विरोध करणाऱ्या महापौरांकडूनच आता कडक लॉकडाऊनची मागणी
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन
चिंतेत वाढ : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले
“तुकाराम मुंढेंना नागपूरला पाठवले तरी मला फरक पडत नाही , मी दोन नंबरची काम करत नाही”
दीपिकाच्या चौकशीच्या वेळी मला तिथं उपस्थित राहू द्या ; रणवीरची NCBला विनंती

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आता पुण्यातील कोरोनाचा भार हिरकणींच्या खांद्यावर ! InShorts Marathi.

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

Previous article

राज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.