Royal Entertainmentमुख्य बातम्या

आता ‘ई-गोपाला’ अ‍ॅपद्वारे पशूंना मिळणार आधार कार्ड !

0

आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता हे आधार कार्ड चक्क आपल्या पशुंनाही मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ई-गोपाला’ (e-Gopala App) ॲपची नुकतीच सुरुवात केली. यामुळे दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे. 
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि प्राण्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी हे एक ऑनलाइन डिजिटल माध्यम आहे. याद्वारे जनावरांना टॅगिंग प्रक्रिया करून आधारकार्ड दिले जाणार आहे. काय आहे हे ॲप? यामुळे गो-पालकांना कोणत्या सुविधा मिळतील, याबद्दल माहिती घेऊ.
भारतामध्ये सगळ्या जनावरांची टॅगिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक गाय आणि म्हैशीसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर लागू करण्यात येणार आहे. त्याचा फायदा असा होईल, की पशुपालक सॉफ्टवेअरच्या मदतीने घरबसल्या आपल्या जनावरांविषयी माहिती प्राप्त करू शकतात. तसेच जनावरांचे लसीकरण, चिकित्सा इत्यादी सगळ्या प्रकारची कामे करणे फार सोपे होणार आहे. भारतामध्ये सगळ्या पशुधनाच्या सखोल माहितीसाठी एक प्रचंड असा डाटाबेस तयार करण्यात येत आहे. पशुपालनाच्या मदतीने शेतकऱ्यांची आर्थिक आवक वाढवणे हे या ॲपचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. आता टॅगिंग म्हणजे काय समजून घेऊ.
या योजनेच्याद्वारे आधार नंबरसाठी गाय, म्हैस इत्यादी पाळीव प्राण्यांच्या कानामध्ये आठ ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग लावला जाईल व या टॅबवर बारा अंकांचा आधार नंबर असेल. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत चार कोटी गाई आणि म्हशींसाठी आधार कार्ड बनवले गेले आहे. भारतामध्ये कमीत कमी तीस कोटीपेक्षा जास्त गायी आणि म्हशी आहेत. या योजनेद्वारे अभियान चालवून प्रत्येक जनावरांची टॅगिंग करण्यात येणार आहे.
या ॲपमुळे दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना उच्च प्रतीचे वीर्य, गर्भ आणि प्राणी यांच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळेल आणि ते खरेदी करण्यास सक्षम होतील. यासह, स्थानिक आहार स्त्रोतांकडून संतुलित रेशन तयार करण्याबद्दल आपल्याला माहिती देखील मिळेल. आयुर्वेद पशुवैद्यकीय आणि कमी किंमतीच्या औषधोपचारांची माहिती अ‍ॅपवर उपलब्ध आहे.
हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. यामध्ये, गो-मालकाला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकासह लॉग इन करावे लागेल. यानंतर सहा पर्याय दिसून येतील. पहिला पर्याय म्हणजे जनावरांचे पोषण, ज्यामध्ये खाद्य पदार्थांचे प्रमाण आणि पोषण याबाबत माहिती उपलब्ध आहे. पुढील पर्याय आयुर्वेदिक औषधाचा आहे, ज्यामध्ये प्राण्यांचा आजार आणि त्याचे आयुर्वेदिक उपचार पाहू शकतात.
माय अ‍ॅनिमल आधार पर्यायामध्ये शेतकरी त्यांची नवीन, जुनी जनावरांची माहिती पाहू शकतात आणि नवीन प्राणी नोंदणी करण्यास सक्षम असतील. सतर्कतेमध्ये, शेतकऱ्यांना जनावरांच्या लसीकरणाच्या तारखेसारखी माहिती मिळेल. अ‍ॅपवर आपण जवळच्या लसीकरण शिबिर किंवा प्रशिक्षण शिबिराबद्दल जाणून घेऊ शकता. पशू बाजारपेठेतील पर्यायात, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ आणि वीर्य स्थानकांविषयी शेतकर्‍यांना माहिती मिळते.
ई-गोपाला (e-Gopala App) अ‍ॅप एक ऑनलाइन डिजिटल माध्यम असेल जे पशुपालकांना प्रगत पशुधनाची निवड करण्यास मदत करेल आणि त्यांना मध्यस्थांकडून मुक्त केले जाईल.
The post आता ‘ई-गोपाला’ अ‍ॅपद्वारे पशूंना मिळणार आधार कार्ड ! appeared first on Dainik Prabhat.

आता ‘ई-गोपाला’ अ‍ॅपद्वारे पशूंना मिळणार आधार कार्ड !

Previous article

ऑक्टोबरमध्ये आयफोनप्रेमींना पर्वणी!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.