Royal Entertainmentमुख्य बातम्या

विवेक ओबेरॉयच्या पत्नीला नोटीस

0

मुंबई  – सॅंडलवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेता विवेक ओबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा यांना त्यांचा भाऊ आदित्य अल्वा फरार झाल्यामुळे नोटीस बजावली आहे. काल या प्रकरणात बंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेने विवेकच्या घरावर त्याला शोधण्यासाठी छापाही टाकला होता.
आदित्यवर चार सप्टेंबरला गुन्हा नोंदवण्यात आला असून तेव्हापासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे.
या प्रकरणात त्याला शोधण्यासाठी लूकआऊट नोटीस तीन आठवड्यांपूर्वी देण्यात आली होती. गुरुवारी घातलेल्या छाप्यात तो विवेक ओबेरॉय यांच्या निवासस्थानी आढळला नव्हता.
आदित्य अल्वा हा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जीवराज अल्वा यांचा पुत्र असून त्याचे नाव सॅंडलवूड ड्रग्ज प्रकरणात 11 आरोपींमध्ये आहे. या प्रकरणात रागिणी द्विवेदी आणि संजना गलराणी यांच्यासह अनेक दिग्गजांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यात दर शनिवारी कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसाठी पार्टी आयोजित करत असे, त्या फार्महाऊसवरही छापा टाकला होता.
ओबेरॉय यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यानंतर ओबेरॉय कुटुंबांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
The post विवेक ओबेरॉयच्या पत्नीला नोटीस appeared first on Dainik Prabhat.

या नवरात्रात तेजस्विनी कोणाचं रुप साकारणार?, पहा पुर्वीचे फोटो…

Previous article

आणि ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आज ही अजय देवगणसाठी आहे अविवाहित, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.