मुख्य बातम्या

मास्क न घालणे,धुमप्रान करणे राज ठाकरेंना पडले महागात ; अधिकाऱ्यांनी घेतली ‘ही’ अॅक्शन

0

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अद्यापही पुढील काही काळ मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टन्स ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळेच राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे.
लॉकडाऊन आणि कोरोना रोगाचा प्रसार वाढ नये, यासाठी काळजी म्हणून नियमांचे कडेकोट पालन करण्याचे सरकारने बजावले आहे. मात्र असं असतानाही देखील मनसेप्रमुखराज ठाकरे अनेकवेळा मास्क परिधान न करताच प्रवास करत असल्याचे समोर आले होते. परंतु यावेळी मास्क न घातल्याचा फटका राज ठाकरेंना बसला असल्याचे समोर आले आहे.
राज ठाकरे कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने प्रवास केला. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी उद्घोषणा केली जात होती. मात्र राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही शिलगावली होती. या सर्व प्रकारानंतर बोटीवरील अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना नियमांची माहिती दिली. यानंतर आपली चूक लक्षात येताच राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे राज ठाकरेंनी १००० रुपयांचा दंड देखील भरला, अशी माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या :-

त्या’ अभिनेत्रीचं नाव घ्यायची तिची लायकी नाही ; कंगनावरून गृहमंत्री संतापले
‘पोलिस अधिकाऱ्यांकडूनच सरकार पाडण्याचा प्रयत्न’ , गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा मोठा गौप्यस्फोट
मराठा आरक्षणाच्या १३% जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी ; विनायक मेटेंची मागणी
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मास्क न घालणे,धुमप्रान करणे राज ठाकरेंना पडले महागात ; अधिकाऱ्यांनी घेतली ‘ही’ अॅक्शन InShorts Marathi.

कोरोनाचा हैदोस ! केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला समज , चाचण्या वाढवा नाहीतर…

Previous article

कृषी विधेयकांवर मोदी सरकारला पाठिंबा नाही , राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

Next article

You may also like

Comments

Comments are closed.