Royal politicsटॉप पोस्ट

मी माझी राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना मांडत आहे :- प्रणब मुखर्जी

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोह आज पार पडला. यात सगळ्यात चर्चेचा विषय ठरला  माजी राष्ट्रपती  प्रणब मुखर्जी यांची प्रमुख आतिथी म्हणून उपस्थिती. आज होणार्‍या या कार्यक्रमात संघाच्या मंचावरून माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी नक्की काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

हा कार्यक्रम नागपुरातील रेशीमबागेत पार पडला.या वेळी एकाच मंचावर प्रणब मुखर्जी आणि मोहन भागवत उपस्थित होते. दोन वेगळ्या विचारांचे व्यक्ती एका मंचावर उपस्थित असल्याने नक्की दोघे काय बोलणार हे सामान्यांसाठी आणि कॉंग्रेससाठी महत्वाचे ठरणार होते. या कार्यक्रमात प्रणब मुखर्जीकडून त्यांची राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना काय हे सांगण्यात आले. आज संघाच्या मंच्यावरून त्यांनी राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना ठामपणे मांडत भाजपला अप्रत्यक्षपणे सुनावले.

Loading...

माझी राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना-

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी  म्हणाले की, “मी आज माझी राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना मांडत आहे. भारताचा राष्ट्रवाद हा वसुदैव कुटुंबकम आहे.  भारत हा स्वतंत्र विचाराचा देश आहे. इ.स. पूर्व  ६०० ते १८००  या काळात भारत शिक्षणाचे केंद्र होते. विविधता हेच भारताचे वैशिष्ट्य आहे, विविध वर्ण, भाषा ही भारताची खरी ओळख आहे. विविधता, सहिष्णुता भारतात वसलेली आहे, ५० वर्षापासून मी हेच शिकलो आहे. सहिष्णुता आपल्या देशासाठी सर्वात महत्वाची आहे. हिंदू , मुस्लिम, ख्रिश्चन, शीख ह्या सर्वांनी भारत निर्माण होतो. फक्त एक भाषा, एक धर्म ही भारताची ओळख नाही. राष्ट्रवाद हा  कोणत्याही एका भाषेच्या, जात, धर्माच्या अधीन नाही. संविधांनामुळे राष्ट्रीय भावना आधिक दृढ होते. आम्ही जर तिरस्कार,  भेदभाव     करीत राहिलो तर देशाची ओळख धोक्यात येईल. हिंसाचार, तिरस्कार यांचा मार्ग सोडून आपण शांततेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. एकीकडे  देशाची आर्थिक प्रगती होत आहे, तर दुसरीकडे आयुष्यातील आनंदाचे क्षण कमी होत चालले आहेत.” अशी देशभक्तीची संकल्पना स्पष्ट करीत; जय हिंद, वंदे मातरम म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

या आधी संघाचा कार्यक्रम सुरू होताच कॉंग्रेसकडून ट्विट करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करण्यात आले.

हे ही वाचा/पहा-
VIDEO: संघाचा कार्यक्रम सुरु होताच कॉंग्रेसकडून ट्विट करत संघावर आरोप

(PHOTO INPUT:- FACEBOOK/RSS )

Loading...

VIDEO: संघाचा कार्यक्रम सुरु होताच कॉंग्रेसकडून ट्विट करत संघावर आरोप

Previous article

फेसबूक प्राइवेसी सेटिंगवर ‘बग’चा हल्ला; 14 मिलियन युजर्सवर परिणाम

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *