मुख्य बातम्या

मराठा आरक्षणावर राजकारण नको , ठाकरे सरकारला आम्ही सहकार्य करू – देवेंद्र फडणवीस

0

माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी मराठा आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये. मराठा आरक्षण हे राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईत आम्ही सरकारला सहकार्य करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सरकार मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार आहेत. न्यायालयीन लढाईसाठी तज्ज्ञ वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला ; अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र
सिनेसृष्टीला मोठा धक्का : ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन !
राज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे
आता पुण्यातील कोरोनाचा भार हिरकणींच्या खांद्यावर !
चिंतेत वाढ : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा आरक्षणावर राजकारण नको , ठाकरे सरकारला आम्ही सहकार्य करू – देवेंद्र फडणवीस InShorts Marathi.

तुम्ही लवकरच पुन्हा लढताना दिसाल ; आव्हाडांचं एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास ट्वीट

Previous article

“बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांत प्रकरणाचं राजकारण”

Next article

You may also like

Comments

Comments are closed.