मुख्य बातम्या

शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही ; निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

0

 मंगळवारी शरद पवार यांच्या नावावरुन राजकीय वर्तुळात वादळ आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याचं वृत्त अनेकांचं लक्ष वेधून गेलं आणि बऱ्याच चर्चांना वाव मिळाला. पण, आता मात्र निवडणूक आयोगाकडूनच अत्यंच महत्त्वाची माहिती देत पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुनच आयकर विभागानं शरद पवार यांच्या नावे नोटीस पाठवली होती असं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं यात म्हटलं गेल्याची माहिती समोर आली. पण, निवडणूक आयोगानं असा कोणताही इशारा दिला नसल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं आहे.
२००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचं म्हटलं गेलं होतं. नोटीस आल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रियाही दिली होती.
महत्वाच्या बातम्या :-

Alert : मुसळधार पावसामुळे खरीप पिक खराब होण्याचा हवामान खात्याकडून इशारा !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध
बाप रे ! गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले !!
मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले ; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही ; निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा InShorts Marathi.

Corona Update : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची बाधा

Previous article

महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.