मुख्य बातम्या

दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली तरी खडसे भाजप सोडून जाऊ शकत नाही – सुधीर मुनगंटीवार

0

भाजप नेते एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
हा बडा नेता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेच असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात खलबतं सुरु आहेत.
“मी १९८० पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याशी अनेकदा बैठकीत, वैयक्तिक, प्रत्यक्ष संपर्क आला. त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मी समजून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल मनामध्ये दु:ख असू शकते. पण कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे की खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली तरी खडसे भाजप सोडून जाऊ शकत नाही – सुधीर मुनगंटीवार InShorts Marathi.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची मोदींकडे ‘ही’ मागणी

Previous article

शिवसेनेनं करून दाखवलचं , मुंबईची तुंबई केली ; प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

Next article

You may also like

Comments

Comments are closed.