Royal politicsटॉप पोस्ट

नितीश कुमार करणार बिहारमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचे नेतृत्व

0

पटना (बिहार) : –

जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएचे नेतृत्व करणार आहेत. याची माहिती पार्टीचे जनरल सेक्रटरी व प्रवक्ता के. सी. त्यागी यांनी दिली.

Loading...

पार्टीच्या मुख्य नेत्यांंमध्ये चार तास चाललेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याची माहिती के सी त्यागी यांनी दिली.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, त्यागी म्हणाले की “नितीश कुमार यांच्या  लोकप्रियतेचा जास्तीत फायदा एनडीएला करुन देण्याचा आमचा प्रयत्न असेल.” तसेच पार्टीचे दुसरे जनरल सेक्रटरी पवन के वर्मा म्हणाले की, “भाजप, लोक जनशक्ती पार्टी  व राष्ट्रीय लोकसमता पार्टी हे सर्व पक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीला सामोरे जातील.”

हा निर्णय मोदींचे लोकांमध्ये असलेल्या आकर्षण कमी होत चालल्याचे दर्शवत आहे. कारण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे बिहार बरोबरच प्रत्येक राज्यामध्ये एनडीएचा चेहरा होते. बिहारमध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 40 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या.

थोड्याच दिवसापूर्वी जनता दल (युनायटेड) व भाजपच्या युतीला बिहारमधील दोन महत्वाच्या पोट निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. 31 मे रोजी अररीया जिल्ह्यातील जोकीहट येथे पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचा विजय झाला होता. नितीश कुमार यांच्यासाठी ही जागा महत्वाची होती, कारण मागील तीन वेळेस त्यांच्या पक्षाचा या ठिकाणी विजय झाला होता.

जुलै 2017 मध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड)ने लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाशी असलेली युती तोडत भाजपशी हात मिळवणी केली होती व भाजपच्या सहयोगाने  सरकार स्थापन केले होते.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/NITISH KUMAR)

 

Loading...

शेतकर्‍यांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक, होईल का मागण्याची पूर्तता पूर्ण?

Previous article

यूपीए-2 पेक्षा, मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या कलावधीत झालेले बँकिंग घोटाळे 3 पट अधिक: आरबीआय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *