Royal politicsटॉप पोस्ट

Nirbhaya Case:- ‘त्या’ क्रूर दोषींची फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

0

दिल्ली:-

दिल्लीमध्ये घडलेल्या भयानक निर्भया प्रकरणाबद्दलच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे आता दोषीना फाशी होणार हे स्पष्ट झाले आहे. या घटनेला 6 वर्ष होऊन गेले, या काळात निर्भया प्रकरणाबद्दल दोषींच्या शिक्षेच्या अनेक घडामोडी घडल्या. परंतू देशातील अशा क्रूर घटना काही कमी झाल्या नाहीत.

Loading...

निर्भया प्रकरणातील 4 दोषींपैकी 3 दोषींनी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरूद्ध पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने या तिघांचीही फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

4 पैकी 3 दोषींनी दाखल केली होती पुनर्विचार याचिका-  

विनय शर्मा, मुकेश, पवन गुप्ता या 3 आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात शिक्षेविरूद्ध पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यातील अक्षय ठाकुर या दोषीने याचिका दाखल केली नव्हती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण आणि न्या. भानुमती यांनी दोषीच्या पुनर्विचार याचिकेवर निर्णय सुनावताना फाशीची शिक्षा कायम ठेवली.

न्यायाधीश अशोक भूषण हा निर्णय देताना म्हणाले की, “दोषींच्या बाबतीत पुनर्विचार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा कायद्यामध्ये काही स्पष्ट चुका असतील.”

तर न्या. भानुमती म्हणाले की, मुलांना लहान वयातच स्त्रियांचा आदर करणे शिकवले पाहिजे. 

अशा घटना रोखण्यात व्यवस्था अपयशी- 

निर्भयाच्या आईने (आशा देवी) न्यायालयाच्या या निर्णयापूर्वी संगितले की, या घटनेला 6 वर्ष होऊन गेली आहेत, आणि अजून देखील अशा घटना सतत घडत आहेत, आपली व्यवस्था अशा घटना रोखण्यात अपयशी ठरली आहे. मला विश्वास आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल आणि दोषींना शिक्षा मिळेल.

न्यायालयाने निकाल दिल्या नंतर त्या म्हणल्या की, “आमचा लढा इथेच संपलेला नाही, निकालाला बराच उशीर झाला आहे. याचा परिणाम देशातील अन्य मुलींवर होत आहे. मी न्यायालयाला विनंती करते की, दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.”

दोषींना लवकर फाशी व्हावी- 

या निकालानंतर निर्भया च्या वडिल म्हणाले की, आम्हाला खात्री होती की, पुनर्विचार याचिका फेटाळली जाईल. पण आता पुढे काय होणार? खूप वेळ निघून गेला आहे आणि या काळात महिलांबाबत धोका वाढतच गेला आहे.  मला वाटते की, लवकरच दोषींना फाशी व्हावी. 

सर्वोच्च न्यायलाय म्हणाले की, निर्भया प्रकरण हृदय हलवून टाकणारी घटना होती. दोषींनी यात अत्यंत भयानक क्रूरता आणि राक्षसीपणा दाखवला. या घटनेने समाज पूर्णता हादरून गेला.

या निर्भया प्रकरणात एकूण 6 आरोपीना अटक करण्यात आली होती, त्यातील एकाने (रामसिंह) याने तीहर तुरुंगात आत्महत्या केली, तर यातील एकाला अल्पवयीन असल्याकारणाने 3 वर्षाची बाल सुधारग्रहाची शिक्षा देऊन सोडण्यात आले होते.

काय घडले होते निर्भया प्रकणात- 

दिल्ली मध्ये 12 डिसेंबर 2012 ला रात्री चालत्या बसमध्ये  निर्भयाबरोबर हा क्रूर प्रकार घडला होता, यात हे 6 आरोपी सहभागी होते. त्यांनी तिला चालत्या बस मधून फेकून दिले होते. त्यानंतर सिंगापूरमधील हॉस्पिटल मध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. परंतू त्यातच तिचे निधन झाले.

Loading...

कोण होता मुन्ना बजरंगी? ज्याची उत्तर प्रदेशमधील जेलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली

Previous article

अस्तित्वातच नसलेल्या जिओच्या शिक्षण संस्थेचा दर्जा ‘श्रेष्ठ’, केंद्र सरकारचा जादुई निर्णय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *