मुख्य बातम्या

चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !

0

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात नव्या ९६ हजार ५५१ झाली आहे. तर एक हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहोचली आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.
दिलासादायक बाब, म्हणजे ज्या वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहून अधिक वेगात या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या आधिक आहे. सध्या देशात ९ लाख ४३ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू असून ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ लाख ४३ हजार ७७२ एवढा झाला आहे, यापैकी २लाख ४३ हजार ४४६ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनामुळे २७ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातलं कोरोना मृत्यूचं प्रमाण २.९ टक्के एवढं आहे.
महत्वाच्या बातम्या :-

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला
मुंबईत येतेय कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा ; कंगना रनौतचे खुले चॅलेंज
कंगना द्रौपदी तर उद्धव ठाकरे दुःशासन ; शहरात लागलेल्या पोस्टरवरून राजकीय महाभारत पेटले !
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर ! InShorts Marathi.

उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला

Previous article

महत्वाची बातमी : मंदिर, रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.