टॉप पोस्ट

अजब-गजब: या देशात आहे असे एक अनोखे घड्याळ जे दाखवते एकाच वेळी जगातील 148 शहरांची योग्य वेळ

0

तुमच्याकडे असे घड्याळ असले तर जे एकावेळी जगातील 100 पेक्षा जास्त शहरांची वेळ दाखवेल, ते ही एकाच वेळी… पण असे घड्याळ खरच अस्तित्वात आहे ते ही जर्मनी मध्ये. आणि एका ऐतिहासिक शहरात ज्या मुळे जर्मनीचे एकीकरण झाले. बर्लिन… जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरातील हे घड्याळ एलेक्जेंडरपल्स स्केअर या चौकत आहे. आणि एकावेळी जगातील 148 शहरांची वेळ अगदी बरोबर दाखवते. या घड्याळचे नाव आहे ‘युरेनिया वर्ल्ड क्लॉक’. 

uroniya world clock berlin

uroniya world clock berlin

Loading...

याच घड्याळामुळे ही जागा अत्यंत प्रसिद्ध आहे. जेव्हा पासून हे जगाची वेळ सांगणारे घड्याळ या शहरात उभारण्यात आले  तेव्हा पासून या शहरातील बर्लिनवासीयांचे एकमेकांना भेटण्याचे हे ठिकाण एकदम फेमस झाले. आणि याच घड्याळामुळे जगभरातील लोक या शहराकडे आकर्षित होतात. आणि ही जागा याच घड्याळासाठी ओळखली जाते. आतापर्यंत अनेक वेळा या घड्याळाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

या घड्याळाला लवकरच 50 वर्ष पूर्ण होणार आहे. याची उभारणी 30 सप्टेंबर 1969 ला या शहरात करण्यात आली. या घड्याळाच्या जडणघडणीत जास्तीत जास्त अॅल्युमिनियम या धातूचा वापर करण्यात आला आहे. आणि हे एकाच वेळी जगातील वेगवेगळ्या 148 प्रमुख शहरांची योग्य वेळ दाखवते.

uroniya world clock berlin

uroniya world clock berlin

काय आहे या जगाची वेळ सांगणार्‍या घड्याळचा इतिहास- 

1966 ला येथे दुसर्‍या विश्व युद्धाआधीचे घड्याळचे काही अवशेष सापडले होते, यानंतर शहरात असेच एक घड्याळ उभारण्याची योजना बनवण्यात आली, जे सगळ्या जगाचे प्रतिनिधित्व करेल.

शहरात घड्याळ उभारण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर बर्लिन शहरातील प्रसिद्ध डिझायनर एरिक डॉन यांना युरेनिया वर्ल्ड क्लॉक या घड्याळाची डिझाईन बनवण्याचे काम सुपूर्त केले गेले.

बर्लिन शहराचा इतिहास बराच गाजलेला आहे. त्यावर अनेक सिनेमे, पुस्तके लिहिली गेली, आणि याच शहरातील हे अनोखे घड्याळ आज एकाचवेळी जगभरातील अनेक शहरांची योग्य वेळ दाखवत जगाचे प्रतिनिधित्व करीत आहे.

uroniya world clock berlin

uroniya world clock berlin

हे ही वाचा- 

महाराष्ट्र सरकारचा यू-टर्न, बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये घेऊन जाण्यास बंदी

पुणेकरांनो, आता थेट तक्रार नोंदवा पोलिस कमिशनरांच्या व्हाॅट्स अॅपवर, हा आहे नंबर

Loading...

पुणेकरांनो, आता थेट तक्रार नोंदवा पोलिस कमिशनरांच्या व्हाॅट्स अॅपवर, हा आहे नंबर

Previous article

Manmarziyaan Trailer : बोल्ड, क्रेजी, काॅमप्लिकेटेड ; पण इमोशनल ‘मनमर्जिया’

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *