Royal politicsटॉप पोस्ट

9 ऑगस्ट ‘क्रांति दिन’ भारताच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील एक लक्षात ठेवावा असा दिवस

0

9 ऑगस्ट हा भारतभरात क्रांति दिन म्हणून साजरा केला जातो, पण त्याचा इतिहास नक्की आहे तरी काय?  असे काय कारण होते की 9 ऑगस्ट हा दिवस चर्चेत आला? त्यात क्रांतिकारकांचे, राष्ट्रपिता महात्मा गांधीचे नक्की काय कार्य होते? असे अनेक प्रश्न या क्रांतिदिनी पडतात. हा एक असा दिवस आहे ज्याने ब्रिटीशांना भारत सोडण्यासाठी भाग पडले, असा हा दिवस नक्की आहे तरी काय?

ऑगस्ट क्रांतीचा नारा ‘भारत छोडो’-

या क्रांतीचा नारा होता, ‘भारत छोडो’… आणि या एका वाक्याने अशी काही जादू केली की सारा भारत रस्त्यावर उतरला. एक क्षण असे वाटले होते की आता कोणत्याही परिस्थितीत लगेच ब्रिटिश भारत सोडून जातील.  हा काळ होता 1942 सालचा, सार जग टांगणीला लागला होते कारण जगात एक महाभयंकर घटना घडत होती. ‘दुसरे महायुद्ध.,’ या महायुद्धात सतत होत असलेल्या मित्र राष्ट्रांच्या पराभवामुळे ब्रिटिश हैराण झाले होते. आणि नेमक त्याच वेळी भारत ऑगस्ट क्रांतिने ‘छोडो भारत’चा नारा देत पेटून उठला होता. ब्रिटीशांसाठी ही वेळ एकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. 

chodo bharat 2
Loading...

chodo bharat August kranti 

या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपान आता भारतावर आक्रमण करेल याची शक्यता वाढत चालली होती, कारण जपान आता प्रशांत महासागर ओलांडून ब्रम्हदेशापर्यंत (म्यानमार) येऊन पोहचला होता. ब्रिटीशांना आता भारतीयांच्या मदतीची गरज होती. त्यांना आता भीती वाटायला लागली होती की जपान आता भारतावर हल्ला करणार. त्यामुळे  ब्रिटीशांनी भारतीयांची मदत मिळवण्यासाठी भारतात असा प्रचार करण्यास सुरुवात केली की, ‘भारतीय स्वतः आपल्या देशाचे मालक आहेत आणि आपल्या देशाचे संरक्षण त्यांनीच केले पाहिजे, कारण भारतावर जपानच्या हल्ल्याचा भीती वाढत आहे.’ 

ब्रिटीशांच्या प्रचारला विरोध करीत गांधीजींनी असे मत मांडले की, “ब्रिटिश भारतात असल्याने जपान भारतावर आक्रमण करीत आहे, म्हणून ब्रिटीशांनी भारत सोडून जावे आणि भारतीयांच्या हाती सत्ता सोपवावी. जर ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली तरच भारत ब्रिटीशांना युद्धात मदत करेल.”

chodo bharat August kranti

chodo bharat August kranti

फोडा आणि राज्य करा ही नीती धोरणे रखणारे ब्रिटिश हे ऐकण्यास तयार नव्हते, ब्रिटीशांनी याला नकार दिल्याने भारत छोडो अशी धमकी देत भारतीय आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरच उतरले. अनेक कॉंग्रेसच्या नेत्याचे मत होते की जपान युद्धासाठी आवासून असताना आंदोलन करण्याची ही योग्य वेळ नव्हती.  यावर निर्णय घेण्यासाठी 1942 ला वर्ध्यात कॉंग्रेस ची बैठक घेण्यात आली आणि त्यात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या पुढाकाराने ‘अहिंसा विधरोह’ हा कार्यक्रम पारित करण्यात आला.

8 ऑगस्ट 1942 ला मुंबई मध्ये अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस महासमितीची बैठक घेऊन भारत छोडो चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

‘संप्रदायिकताची छाप असेल तर तुम्ही या संघर्षापासून लांब राहिले पाहिजे.’

7 आणि 8 ऑगस्ट ला जेव्हा प्रस्तावावर चर्चा झाली तेव्हा गांधीजी म्हणाले की, “स्वतंत्र मिळाले की आपले काम संपणार नाही, आपल्याला कोणीही हुकूमशहा नको, आपले ध्येय स्वतंत्र मिळवणं आहे, आणि त्यानंतर जो कोणी शासन सांभाळू शकत असेल त्यांनी ते सांभाळावे. शक्यता आहे की तुम्ही निर्णय घ्याल की सत्ता पारसीयांकडे सोपवण्याचा, परंतु तुम्ही हे म्हणू नका की सत्ता पारसींकडे का सोपवावी. शक्यता आहे की सत्ता त्यांना सोपवली जाईल ज्यांचे नाव कॉंग्रेस मध्ये कधी घेतलेही नसू शकेल. हा निर्णय घेण्याचे काम लोकांचे आहे. तुम्ही हा नाही विचार केला पाहिजे की संघर्ष करताना अधिक संख्या हिंदूची होती, मुस्लिम आणि परसींची कमी होती, आणि जर तुमच्या मनात तीळमात्र देखील संप्रदायिकताची छाप असेल तर तुम्ही या संघर्षापासून लांब राहिले पाहिजे.”

या भारत छोडो प्रस्तावात सामूहिक संघर्ष करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु ब्रिटिश सरकारने संघर्षाला सुरुवात होण्याआधीच रातोरात महात्मा गांधी आणि कॉंग्रेस च्या सक्रिय नेत्यांना अटक केली. त्यांना पुण्यातील आगाखान पेलेस मध्ये बंदी बनवण्यात आले. याने देशातील वातावरण आणखीनच तापले. भारतीयांनी ‘करो या मरो चा नारा’ दिला. ठिक ठिकाणी बंद पळण्यात आला, आंदोलने झाली, हिंसाचार वाढला,  सरकारी इमारती जाळण्यात आल्या. देशात भयाण परिस्थिती निर्माण झाली होती.

chodo bharat August kranti

chodo bharat August kranti

याच दरम्यान कस्तुरबा गांधी आजाराने मरण पावल्या, तर गांधीजी मलेरियाने आजारी होते. याकारणाने लोक अजूनच चिडून उठले, त्यांनी गांधीजीची सुटका करावी अशी मागणी केली, वातावरण आणखी चिघळेल या भीती ब्रिटिशांनी गांधीजींची आणि त्यांच्या सहकार्‍यांची सुटका केली.

भारत छोडो आंदोलनात 940 पेक्षा जास्त आंदोलनकारी मारल्या गेले, 1600 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. तर 60 हजार पेक्षा जास्त आंदोकारांना अटक करण्यात आली.   

Loading...

Manmarziyaan Trailer : बोल्ड, क्रेजी, काॅमप्लिकेटेड ; पण इमोशनल ‘मनमर्जिया’

Previous article

राज्यसभेत विरोधकांची दांडी गुल, उपसभापती निवडणुकीत एनडीएने मारली बाजी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *