टॉप पोस्ट

नीरव मोदी विरोधात काढण्यात आले अटक वॉरंट, खरंच होईल का अटक ?

0

नीरव मोदी या फरार हिरे व्यापार्‍याने पंजाब नॅशनल बँकेला गंडा घातल्यानंतर आता आणखी एका गुन्ह्यासाठी त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय- डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) करचुकावेगिरी केल्याप्रकरणी खटला दाखल केला आहे. सूरत येथील न्यायालयाने नीरव मोदी विरुद्ध अटक वॉरंट काढले असून, मोदीला ईमेलद्वारे अटक वॉरंट बजावले आहे.

Loading...

का बजावले डीआरआयने नीरव मोदी विरोधात अटक वॉरंट-

हे प्रकरण नीरव मोदीकडून करण्यात आलेल्या ‘ड्युटी फ्री’ पद्धतीने आयात करण्यात येणार्‍या मोत्यांच्या आणि पैलू पडण्यात आलेल्या हिर्‍यांच्या बाबतीत हेराफेर केल्या प्रकरणी आरोप ठेवून खटला दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण पीएनबी या कर्ज घोटाळा प्रकरणाच्या खूप आधीचे असल्याचे कळते आहे.

नीरव मोदी आणि त्याच्या तीन कंपन्यांविरोधात मार्च महिन्यात डीआयआर कडून कारवाई करण्यात आली होती. यामध्ये फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल, फायरस्टार डायमंड आणि रॅडशिर ज्वेलरी या कंपन्यांचा समावेश आहे.

‘ड्युटी फ्री’ पद्धतीने नीरव मोदी ने भारतात आणलेला माल सूरतमध्ये असलेल्या ‘स्पेशल इकनॉमिक झोन’मध्ये (सेझ) असलेल्या आपल्या तीन कंपन्यांमध्ये वळविला.

ज्या मालावर 52 कोटी एवढे आयात शुल्क भरावे लागले असते असा 890 कोटी रूपये एवढ्या मालाचे सीमा शुल्क चुकवून नीरव मोदी ने तो माल असलेल्या ‘सेझ’मध्ये असलेल्या आपल्या तीन कंपन्यांमध्ये वळविला.

तसेच दुबई आणि हाँगकाँग येथे निर्यात करण्यासाठी पाठवण्यात आलेले पर्सल्स 2014 च्या डिसेंबर महिन्यात अडवून तपासण्यात आली होती. यात सापडलेल्या हिर्‍यांचे मूल्य 43.10 कोटी रुपये इतके दाखवण्यात आले होते. या प्रकरणी तपास केल्यानंतर हे सिद्ध झाले की, सरकारमान्य मूल्यांकनानुसार त्याचे मूल्य फक्त 4.93 कोटी रूपये होते.

या प्रकरणी डीआरआय कडून मोदी आणि कंपनी विरोधात सूरत येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला होता. न्यायलायाकडून देण्यात आलेल्या तारखांना कोणीही हजर न राहिल्याने आता नीरव मोदी विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

काय असते सेझ (SEZ)-

स्पेशल इकनॉमिक झोन (special economic zone) या झोन मध्ये विविध खासगी कंपन्यांना सरकारकडून आपला व्यापार करण्यासाठी, उत्पादन बनवण्यासाठी कमी खर्चात जागा उपलब्ध करून दिली जाते. रस्त्यापासून पाण्यापर्यंत सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्या ठिकाणी कंपनी उभारल्यास कंपनीला करांमध्ये अनेक सवलती दिल्या जातात. अर्थात असे असले तरीसरकार कडून उत्पादित होणार्‍या मालावर काही निर्बंध घातले जातात.

जर सेझमध्ये आयात केलेल्या मालावर पुनर्प्रक्रिया करून तो माल मूल्य वाढवून निर्यात करण्यात येणार असेल तरच आयतीला परवानगी दिली जाते.
इथेच नीरव मोदी यांने घोळ घातला आहे. त्याने सीमा शुल्क चुकवून आयात केलेले उच्च दर्जाचे हिरे भारतातच विकले आणि निर्यात करत असल्याचे दाखवण्यासाठी अत्यंत कमी दर्जाचे हिरे वापरले.

याच कारणाने डीआरआय ने नीरव मोदी या फरार हिरे व्यापार्‍याबाबत अटक वॉरंट बजावले आहे.

Loading...

Gold Trailer : देशभक्ती, वंदे मातरम्, ब्रिटिश राज, हाॅकी आणि बरचं काही

Previous article

तब्बल 15 वर्षांनंतर सरकारने हाती घेतले व्यसनमुक्ती धोरण

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *