Royal politicsटॉप पोस्ट

आतकंवादी संघटनांमध्ये भरती होणाऱ्या काश्मिरी तरूणांविषयी असलेला हा रिपोर्ट आश्चर्यकारक आहे

0

जम्मू काश्मिरमध्ये स्थानिक तरुणांचे आतकंवादी संघटनांमध्ये भरती होणे ही काही नविन गोष्ट नाही. अनेक स्थानिक युवक आतकंवादी संघटनांकडे ओढले जात असतात. पंरतू हे तरूण कोणत्या बॅकग्राउंडमधून येतात या विषयीचा नवीन खुलासा समोर आला आहे व हा रिपोर्ट नक्कीच आश्चर्यकारक आहे. जम्मू काश्मिर पोलिसांच्या क्रिमिनल इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंटच्या (CID) 74 पानांच्या गोपनीय रिपोर्टमधून अशी काही तथ्ये बाहेर आली आहेत की जी मागील सर्व मान्यता मोडून काढतात.

द इंडियन एक्सप्रेसनुसार, आतकंवादी संघटनेमध्ये समाविष्ट होणारे तरूण हे मदरशांमध्ये शिकलेले नसून बहूतांश तरूणांचे शिक्षण हे सरकारी शाळांमधून झालेले आहे. यामध्ये 15 ते 20 वर्षांच्या तरुणांचा अधिक समावेश आहे. तसेच ही मुले अगदी सामान्य कुटूंबातून आल्याचे दिसून येते. त्यांचे वागणे देखील इतर मुलांप्रमाणे अगदीच सामान्य असते. त्यामुळे ते आतकंवादी संघटनेमध्ये भरती होतील या विषयी अंदाज वर्तवने देखील कठीण असते व ते का भरती होतात या हे सांगणे देखील अवघड होते.

Loading...

वृत्तपत्रानुसार, या रिपोर्टचे नाव  ‘जम्मू काश्मिर मधील कट्टरता व आतकंवाद’ – एक अभ्यास’  असे आहे. या रिपोर्टमध्ये आतकंवादी संघटनामध्ये भरती झालेल्या 156 तरूणांचा सविस्तरपणे अभ्यास करण्यात आला आहे. हे सर्व तरूण 2010 ते 2015 या वर्षा दरम्यान आतकंवादी संघटनांमध्ये भरती झाले होते.

हा रिपोर्ट या तरूणांविषयी भेटलेली माहिती, त्यांचे मित्र, परिवार, परिचित व्यक्ती व शेजारच्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे.  या रिपोर्टनुसार हे तरूण एखाद्या विचारसरणीने प्रेरित होऊन आतकंवादी संघटनामध्ये भरती होतात, हे मत बदलून टाकते.

रिपोर्टनुसार, ज्या तरुणांचा अभ्यास करण्यात आला त्यापैकी 20 % तरूण हे सुरक्षा दलांच्या त्रासामुळे भरती होतात. अधिकतर तरूण हे केवळ काहीतरी रोमांचकारी, थ्रिल करण्यासाठी संघटनेमध्ये भरती होतात. तसेच या तरूणांपैकी 4 % मुलांच्या कुटूंबाचे मासिक उत्पन्न हे 50 हजारापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही मुले गरीबीमुळे भरती होतात असेही नाही.

रिपोर्टमधील काही महत्वाचे मुद्दे –

– भरती होणाऱ्या मुलांपैकी 32 % तरूण हे 10 वी पास झालेले असतात. 19 % मुले ही अंडरग्रॅज्युएट  व ग्रॅज्युएट आहेत. तर 7 % तरूण हे पोस्टग्रॅज्युएट  आहेत. बाकीचे 7 % मुले ही अशिक्षित असतात.

– एकाही तरूणाचे पुर्ण शिक्षण हे मदरशामध्ये झालेले नाहीये. तर 74% मुले ही शिक्षणासाठी दरगाह व मदरशामध्ये गेलेली नाहीत.

– 56 % तरूणांचे शिक्षण हे सरकारी शाळेमध्ये झालेले आहे. 34 % तरूणांचे शिक्षण हे सरकारी व खाजगी शाळांमध्ये झालेले आहे. 7 % तरूणांचे शिक्षण हे  खाजगी शाळांमध्ये झालेले आहे.

-156 पैकी 90 % तरूण हे अविवाहीत आहेत.

– फक्त 8 % तरूणांकडे चांगला रोजगार आहे.

– 72 % तरूणांची कोणत्याही प्रकारची गुन्हगारी पाश्वभुमी नाही.

– भरती होणाऱ्या 15 % तरूणांचे नातेवाईक, जवळचे मित्र हे प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये मारले गेले आहेत.

(PHOTO INPUT :- FACEBOOK)

 

 

Loading...

कर्ज महागणार; आरबीआय कडून रेपो रेट मध्ये वाढ

Previous article

प्रणब मुखर्जी यांच्या आधी ह्या व्यक्ति देखील उपस्थित राहिल्यात संघाच्या कार्यक्रमात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *