खेळटॉप पोस्ट

IND vs AFG : एेतिहासिक मॅचमध्ये अफगाणिस्तानचा ‘एेतिहासिक’ पराभव

0

बेंगलोर (कर्नाटक) : –

भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या एकमात्र टेस्टचा आज दुसरा दिवस खऱ्या अर्थाने बाॅलर्सनी गाजवला. आज दुसऱ्या दिवशी बाॅलर्सनी तब्बल 24 विकेट घेतले. या 24 विकेटमध्ये 20 विकेट भारतीय बाॅलर्सच्या नावावर राहिले व बाॅलर्सच्या जोरावर भारताने एकमात्र मॅचध्ये 1 डाव 262 धावांनी विजय मिळवला. पाहुण्या संघाला मात्र दोन दिवसात पराभवाला सामोरे जावे लागले.

Loading...

भारताचा हा टेस्ट मॅचमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.

कालच्या 6 विकेट 347 वरून पुढे खेळताना, भारतातर्फे हार्दिक पांड्या व रविचंद्रन अश्विन यांनी सावकाश सुरूवात केली. रविचंद्रन अश्विन 18 रन्सवर अहमदजाईच्या बालिंगवर झझाईकडे कॅच देत बाद झाला. रविचंद्रन अश्विन आउट झाल्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या रविद्र जडेजाने हार्दिक पांड्याच्या बरोबरीने डाव सावरला पण तोही 20 रन्सवर नाबीच्या बाॅलिगवर कॅच आउट झाला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरला  हार्दिक पांड्या देखील वफादारच्या बाॅलिंगलर झझाईकडे कॅच देत आउट झाला. त्याने 94 बाॅलमध्ये 10बाॅंड्रीच्या साह्याने 71 रन केले.

हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर आलेल्या ईशांत शर्मा व उमेश यादव या जोडीने काहीवेळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला . पण राशिद खानने 8 रन्सवर आउट करत भारताचा डाव संपवला. भारताने पहिल्या डावात सर्व विकेट गमावत 474 रन्स केले.

भारताच्या 474 रन्सचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरूवात वाईट झाली. चोथ्या ओव्हरला मोहम्मद शहजाद सिंग्ल काढायचा प्रयत्न करत असताना हार्दिक पांड्याच्या अचूक हिटवर तो रनआउट झाला. त्याने 14 रन केले. त्याच्या पुढच्याच ओव्हरला सलामीवीर  जावेद अहमदी ईशांत शर्माच्या बाॅलिंगवर 1 रनवर बोल्ड झाला.

भारताच्या बाॅलिंगसमोर एकही अफगाणिस्तानचा बॅटसमन मोठा स्कोर करू शकला नाही. एका पाठोपाठ एक त्यांचे विकेट पडतच गेले. मोहम्मद नाबीने काहीवेळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्याने अफगाणिस्तानतर्फे पहिल्या डावात सर्वाधिक 24 धावा केल्या.

भारताच्या बाॅलरसमोर अफगाणिस्तानचा पहिला डाव 27.5 ओव्हरमध्ये मात्र 109 रन्सवरच आटोपला व  त्यांच्यावर आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये फाॅलोआॅनची नामुष्की ओढावली.

भारतातर्फे पहिल्या डावात अश्विनने 4 विकेट, ईशांत शर्मा व जडेजाने प्रत्येकी 2 विकेट तर उमेश यादवने 1 विकेट घेतली.

फाॅलोआॅनची नामुष्की ओढावलेला अफगाणिस्तानची टीम दुसऱ्या डावात देखील फारस काही खास करू शकली नाही. पहिल्या डावाप्रमाणेच ते लगातार विकेट गमावत गेले. सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी मात्र 19 रन्सची पार्टनशिप केली. कॅप्टन असगर स्टॅनिगझाई व हशमत्तुल्ला शाहिदी यांनी काहीवेळ अफगाणिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण जडेजाने 23 व्या ओव्हरला असगर स्टॅनिगझाई आउट करत पार्टनशिप तोडली. असगर स्टॅनिगझाई 25 रन्स केले.

अफगानिस्तानचा दुसरा डाव 103 रन्सवर आटोपला व या बरोबर भारताने एकमात्र टेस्ट मॅचमध्ये 1 डाव 262 रन्सनी विजय मिळवला. भारताचा हाआजपर्यंतचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे. या आधी भारताने 2007 मध्ये बांगलादेशला 1 डाव 239 रन्सने हरवले होते. तर  श्रीलंकेला 2017 ला नागपूरमध्ये 1 डाव 239 रन्सने हरवले होते. त्यामुळे अफगाणिस्तानच्या या एेतिहासिक मॅचमध्ये अफगाणिस्तानचा एेतिहासिक पराभव केला.

भारतातर्फे दुसऱ्या डावात उमेश यादव 3 व जडेजाने 4,  तर ईशांत शर्माने 2 व अश्विनने 1  विकेट घेतली.

स्कोरबोर्ड –

भारत पहिला डाव – 474/10   (मुरली विजय 105, शिखर धवन 107, लोकेश राहूल 54, चेतेश्वर पुजारा 35, अजिंक्य रहाणे 10, दिनेश कार्तिक 4 , हार्दिक पांड्या 71, रविचंद्रन अश्विन 18, रविंद्र जडेजा  20,ईशांत शर्मा 8 , उमेश यादव 26 , यामिन अहमदजाई  51/3, वफादार100/2,राशिद खान 154/2, मुजीबूउर रहमान 75/1,  मोहम्मद नाबी 65/1 )

अफगाणिस्तान पहिला डाव – 109/10 (मोहम्मद शहजाद 14, जावेद अहमदी 1, रहमत शाह 14, झझाई 6 , हशमत्तुल्ला शाहिदी 11,असगर स्टॅनिगझाई 11, मोहम्मद नाबी 24 , राशिद खान 7, यामीन अहमदजाई 0 , मुजीबूउर रहमान 15,  वफादार 6* , अश्विन 27/4, ईशांत शर्मा 28/2, जडेजा 18/2, उमेश यादव 18/1)

अफगाणिस्तान दुसरा डाव – 103/10 (मोहम्मद शहजाद 13, जावेद अहमदी 3, रहमत शाह 4, मोहम्मद नाबी 0,  हशमत्तुल्ला शाहिदी 36* ,असगर स्टॅनिगझाई 25, झझाई 1 , राशिद खान 12, यामीन अहमदजाई 1 , मुजीबूउर रहमान 3,  वफादार 0 , अश्विन 32/1, ईशांत शर्मा 17/2, जडेजा 17/4, उमेश यादव 26/3)

(PHOTO INPUT :- FACEBOOK/INDIANCRICKETTEAM)

Loading...

Race 3 Movie Review:- नुसतीच धावाधाव, स्टंट आणि गाड्यांची जाळपोळ

Previous article

विहिरीत अंघोळीसाठी उतरल्याबद्दल तीन लहान मुलांना क्रूर मारहाण; महाराष्ट्रासाठी लज्यास्पत घटना

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ