मुख्य बातम्या

भाजपच्या बालेकिल्ल्यात निर्धार परिवर्तन सभेला भरघोस प्रतिसाद

0

युवा पदाधिकार्‍यांची फळी लागली निवडणुकीच्या तयारीला

पिंपरी-चिंचवड : भाजपच्या बालेकिल्यात निर्धार परिवर्तनाच्या सभेला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद, सभेच्या निमित्ताने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची झालेली एकजूट, सभेच्या नियोजनात अनुभवी नेत्यांसह युवा कार्यकर्त्यांचा पुढाकर आणि नेत्यांची उत्साह निर्माण करणारी भाषणे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. युवा ब्रिगेड मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन करण्याच्या इर्षेने कामाला लागली असून पक्षाकडून आगामी निवडणुकीत युवकांवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. अनुभवी पदाधिकारी आणि युवकांचा समतोल साधून आगामी निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.

Loading...

पवार घराण्याची तिसरी पिढी

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार, पुतणे रोहित पवार राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवा पर्वाला सुरुवात झाली आहे. पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तर, पुतणे रोहित हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असून अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड-कर्जत मतदार संघातून ते विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तसे संकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगवी आणि जामखेड येथील सभेत दिले आहेत. पवार घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

सभा नियोजनात युवकांचा पुढाकार

आगामी निवडणुकीत युवकांवर पक्षाचा भर आहे. पक्षाने युवकांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. सांगवीतील सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी यशस्वी पार पाडली. सभेच्या नियोजनात राष्ट्रवादीचे युवा चेहरे नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, संतोष कोकणे, विनोद नढे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, विक्रांत लांडे, रोहित काटे, राजू बनसोडे, माजी नगरसेवक अतूल शितोळे, राजेंद्र जगताप, भारत केसरी विजय गावडे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, निलेश पांढरकर, युवा नेते संदीप पवार, अभय मांढरे, योगेश गवळी यांचा पुढाकार होता.

तरुण फळीवर जबाबदारी सोपविणार

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष या युवा ब्रिगेडकडे मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातून यावेळी कोणत्याही परस्थितीत राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणण्याचा चंग युवा ब्रिगेडने केला आहे. लोकसभेनंतर सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी युवकांना पक्षसंघटना बळकट करावी लागणार आहे. त्यांना अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाची देखील गरज आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष युवा ब्रिगेडवर मोठी जबाबदारी सोपविणार असल्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

Loading...

‘उपाशी राहण्याची सवय लावून घेतोय’; शेतकऱ्यांच्या मुलींचे उपोषण

Previous article

अशाप्रकारे फ्री मध्ये सेट करा राष्ट्रवादीची ‘हॅलोट्यून’; अत्यंत सोपी पद्धत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.