मुख्य बातम्या

कोरोना रुग्णांचे कसे हाल होतात याचा राष्ट्रवादीच्या आमदारानं सांगितला भयंकर अनुभव !

0

करोनाच्या संसर्गानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या व अन्य रुग्णांचेही कसे हाल होत आहेत याचा भयंकर अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना आला आहे. ‘मी घेतलेला अनुभव फार भयानक होता. अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये,’ अशी भावना त्यांनी हा अनुभव सांगताना व्यक्त केली आहे.
मिटकरी यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. हा अनुभव त्यांना ज्या रात्री आला, त्या रात्रीचे वर्णन मिटकरी यांनी एक ‘निगरगट्ट रात्र’ असं केलं आहे.

‘माझ्या मित्रांचे वडील काल करोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. मित्राच्या वडिलांना ICU मध्ये दाखल करायला बेड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. फोन करणारे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होते. अकोल्यामध्ये “आयकॉन” आणि “ओझोन “अशी दोन हॉस्पिटल आहेत. तिथे त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. पैसा असतानासुद्धा अकोला जिल्ह्यात त्यांना बेड मिळाला नाही हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल,’ अशी खंत मिटकरी यांनी व्यक्त केलीय.
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोरोना रुग्णांचे कसे हाल होतात याचा राष्ट्रवादीच्या आमदारानं सांगितला भयंकर अनुभव ! InShorts Marathi.

Loading...

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर…. ; कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचले

Previous article

काय सांगता ! झेंडुच्या फुलांमुळे शेतकऱ्याने कमवले चक्क 70 लाख रुपये !!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.