Royal politicsटॉप पोस्ट

पाकिस्तानात पोहचताच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अटक, राजकारणाला नवे वळण

0

पाकिस्तानातील न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना काल म्हणजेच शुक्रवारी रात्री अटक पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. ते विमानाने लंडनहून परत येताच त्यांना विमान तळावर ताब्यात घेण्यात आले.

लंडन येथे असलेल्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तेथील न्यायालयाने त्यांना दोषी ठरवेल होते. त्या नंतर दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडी नंतर इतिहाद एअरवेज या विमानाने पाकिस्तानमध्ये अल्लामा इकबाल (लाहोर) या विमान तळावर पोहचताच त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.

Loading...

काल संध्याकाळी 6.15 वाजता नवाज शरीफ आणि मुलगी मरियम हे अबुधाबी विमान तळावरून पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाले होते. परंतू त्यांच्या विमानाला पाकिस्तानात पोहचण्यास 3 तास उशीर झाला. आणि रात्री 9.15 वाजता त्यांना अटक करण्यात आली.

नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरो यांनी या दोघांना अटक केली आहे. नवाज शरीफ यांना या गुन्ह्यात 10 वर्षाच्या तुरुंगवसाची आणि मुलगी मरियम यांना 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लाहोर विमानतळा बाहेर त्यांच्या पक्षाचे पीएमएल-एन चे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे त्यांना अटक करताच हॅलिकॉप्टरने रावळपिंडीच्या तुरुंगात नेण्यात आले. या सगळ्याचा विचार करता तेथील पंजाब प्रांतातील सरकारने लाहोरमध्ये कलाम 144 हे जमावबंदीचे कलाम लागू केले आहे. आणि 10 हजार सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे.

लाहोरमध्ये सध्या छावणीचे स्वरूप आहे. जमावामध्ये आणि पोलिसांमध्ये चकमकी घडत आहेत. तर तब्बल 400 जणांना अटक करण्यात आली आहे.
मरियम यांनी व्हिडिओ ट्विट करून यात माजी पंतप्राधानांनी आपल्या समर्थकांना पाठीशी उभे राहण्याचे आवाहन दिले आहे. देशाचे भवितव्य धोक्यात असल्याचे देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये आहे.

हा काही खटला नाही आणि निकाल देखील नाही, हा प्रकार केवळ सुड घेण्याचा आहे. तो कायम राहणार, माझ्या विरोधात कोणताही खटला नाही, आणि कधीच नव्हता. मला बळकट लोकशाही हवी होती. त्यामुळे राजकारण संपुष्टात आणण्यासाठी आणि मला दूर ठेवण्यासाठी पनामा पेपर प्रकरण सुरू करण्यात आले. असे शरीफ यांनी लंडनहून येण्यापूर्वी एका वृत्तपत्राला संगितले.

नवाज शरीफ यांची पत्नी लंडन येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

Loading...

मराठी माध्यमाच्या 6 वी च्या पुस्तकात गुजरातीचे धडे? महाराष्ट्र सरकारचा गुजराती कारभार

Previous article

घोटाळ्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *