Royal Entertainmentमुख्य बातम्या

आजची नवदुर्गामाता आहे माता ब्रह्मचरिणी, जाणून घ्या माता ब्रह्मचरिणी व्रतकथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

0

देवी म्हणजे आदिशक्ती स्वरुप! स्वयंभू असल्याकारणे तिला ‘आदिशक्ती’ असेही संबोधतात. तसे पहाल तर या आदिशक्तीची नानाविध रूपे आहेत. नवरात्रीमध्ये मात्र त्यातल्या नऊ विशिष्ट रूपांचेच पूजन होते. त्यांच्या वैशिष्टय़ांमुळेच त्यांना ‘नवदुर्गा’ म्हणून संबोधतात. प्रत्येक नवदुर्गाची कथा, उपासना, मंत्र आणि पूजनविधी वेगवेगळे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात. आजची देवी आहे…
ब्रह्मचारिणी माता: देवीच्या नऊ शक्तींपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गामातेचे दुसरे रूप आहे. दुर्गामातेच्या या रूपाचे पूजन करताना भाविक भक्तांमध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि चेतना आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे अनंताचा अनुभव घेऊ लागते. जेंव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो. मातेच्या या नावात ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्माचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या दुर्गामातेचे पूजन केले जाते. या दिवशी साधकाचे मन ‘स्वाधिष्ठान’ चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला मातेची कृपा आणि भक्ती प्राप्त होते.
या दुर्गामातेचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा असून डाव्या हातात कमंडलू आहे. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्या वेळी देवमुनी नारद यांनी तिला भगवान श्रीशिवशंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या मातेला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असेही म्हणतात.
एक हजार वर्षांपर्यंत तिने फक्त फलाहार करून तपश्चर्या केली. या तपश्चय्रेनंतर तिने तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. नंतर सुकलेले बेलपत्रही खायचे सोडून दिल्यामुळे तिला ‘अपर्णा’ हे आणखी एक नाव पडले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून ‘हे देवी! तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान भोलेनाथ श्रीशिवशंकर तुला पतीरूपात प्राप्त होतील. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.’ असा वर दिला.
ब्रह्मचारिणी भक्तांना मनोवांच्छित फळे देणारी मानली जाते. तिची उपासना केल्याने भविकाच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. या दुर्गामातेच्या कृपेने भक्ताला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. या देवीला विद्यांची जननी मानले जाते. माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात असे म्हणतात. नेहमी हातात असलेल्या जपमाळ आणि कमंडलूमुळे ती ज्ञान आणि तंत्र मंत्राने संयुक्त आहे. आपल्या भक्तांना याच गोष्टीच्या आधारावर ती नेहमी विजय मिळवून देते.
आपल्या बुद्धीमध्ये वाढ करून उचित ज्ञानसमृद्ध व्हायचं असेल तर प्रत्येक भाविक भक्ताने या दुर्गामातेचे पूजन केले पाहिजे, कारण, यामुळे आपल्या बुद्धीमध्ये वाढ होते. यासाठी आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंतचा मोजलेला एक अखंड धागा घ्यावा. ‘या देवी सर्वभूतेषु विद्यारुपेण संस्थिता नमस्तस्य, नमस्तस्य, नमस्तस्य नमो नम:’ या मंत्राचा जप करत त्या दोऱ्याला ५४ गाठी माराव्यात. तो धागा देवीला अर्पण करून रोज या मंत्राचा जप करून नवव्या दिवशी हा धागा वाहत्या पाण्यात विसर्जन करावा. त्यामुळे बुद्धीत वाढ होऊन मनुष्य हुशार होतो. अशी हिंदूधर्मशास्त्रात मान्यता आहे. ब्राह्मी ही या देवीची औषधी असल्याने तिची पूजा केल्याने चांगली बुद्धी मिळते. हे होते माता दुर्गेचे दुसरे रूप…
पूजाविधी : एका चौरंगावर कापड घालून त्यावर देवीचा फोटो ठेवावा. नंतर कलशामध्ये फुले, अक्षत, कुंकू, चंदन घालून त्याची पूजा करावी. त्यावर कुंकवाने पाच उभ्या रेषा काढून घ्या. नंतर सुपारीरूपी गणपतीला पंचामृताने न्हाऊ घालावे आणि विडय़ाच्या पानावर ठेवावे. देवीची पूजा करण्याच्या आधी आवाहन करण्यासाठी एका हातात फुलं घेऊन ‘दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू. देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा’ या मंत्राचा उच्चार करून ती फुलं देवीला वहावीत. नंतर देवीला पंचामृताने स्नान घालून तिला हळद, कुंकू, फुलं, अक्षता वहावीत. असल्यास अत्तर लावावे. त्यानंतर आचमन करून संकल्प सोडून देवीला प्रसाद दाखवावा आणि देवीचे हे स्तोत्र वाचावे.
तपश्चारिणी त्वंहि तापत्रय निवारणीम्।
ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्।।
शंकरप्रिया त्वंहि भुक्ति-मुक्ति दायिनी।
शान्तिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणीप्रणमाम्यहम्।।
‘‘ब्रह्मचारिणी माता कवच’’
त्रिपुरा में हृदयं पातु ललाटे पातु शंकरभामिनी।
अर्पण सदापातु नेत्रो,अर्धरी च कपोलो
पंचदशी कण्ठे पातुमध्यदेशे पातुमहेश्वरी
षोडशी सदापातु नाभो गृहो च पादयो।
अंग प्रत्यंग सतत पातु ब्रह्मचारिणी।
पूजेचे महत्त्व : ब्रह्मचारिणी देवीची पूजा करून, सद्गुण, त्याग, मृत्यभाव, गुण आणि मनुष्यामध्ये संयम वाढतो. आयुष्यातील कठीण परिस्थितीतदेखील भक्ताचे मन कर्तव्याच्या मार्गावर विचलित होत नाही. देवी नैतिकता, भ्रष्टाचार आणि त्याच्या साधकांचे दोष दूर करते. तिच्या कृपेने, यश आणि विजय सर्वत्र मिळते, अशी मान्यता आहे.
टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !
The post आजची नवदुर्गामाता आहे माता ब्रह्मचरिणी, जाणून घ्या माता ब्रह्मचरिणी व्रतकथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर… appeared first on STAR Marathi News.

कडू कारले खाण्याचे हे गोड फायदे तुम्हाला माहित आहेत का? हा गं’भीर रो’ग तर होतो मुळापासून न’ष्ट…

Previous article

श्रीखंडेराया या 7 राशींच्या जीवनात आनंद भरणार, नशिब देणार साथ, लवकरच आनंदाची बातमी मिळणार…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.