Royal politicsटॉप पोस्ट

आसाममधील 40 लाख लोक होऊ शकतात बेघर? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0

आसाममध्ये सोमवारी सकाळी राष्ट्रीय नागरिक रजिस्टरच्या (एनआरसी) दुसरा  व अंतिम ड्राफ्ट जारी करण्यात आला आहे. हा ड्राफ्ट जाहिर केल्यानंतर स्पष्ट झाले आहे की, आसाम राज्यात एकूण 3.29 पैकी  2 कोटी 89 लाख लोकांचे नाव यादीत आहे. तर 40 लाख लोकांचे नाव या यादीत नाही.

पहिला ड्राफ्ट  31 डिंसेबरला घोषित करण्यात आला होता. या यादीत 1.9 कोटी लोकांचे नाव होते.

Loading...

काय आहे राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC) ?

आसाम भारतातील एकमात्र असे राज्य जेथे राष्ट्रीय नागरिक रजिस्टर प्रक्रिया राबवली जाते. एनआरसी अशी प्रक्रिया आहे जेथे अप्रत्यक्ष पध्दतीने म्हणजेच अवैध पध्दतीने राहणाऱ्या विदेशी नागरिकांची तपासणी केली जाते व खरे भारतीय नागरिक कोण हे प्रयत्न केला जातो. जर कोणी आसामचा नागरिक असेल आणि तो जर देशातील इतर राज्यांमध्ये काम करत असेल तर त्याने देखील एनआरसी प्रक्रियेत आपले नाव समाविष्ट करणे गरजेचे आहे.

24 मार्च 1971 च्या आधीपासूनच्या तेथील नागरिकांना आपण आसाममध्ये राहत होतो, याचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे की, हा फक्त एक ड्राफ्ट आहे. प्रत्येक नागरिकाला नागरिकत्व सिध्द करण्याची संधी देण्यात येईल.

कधी पासून सूरू आहे हे प्रकरण ?

हे पूर्ण प्रकरण आसाम आंदोलनाशी जोडलेले आहे. 1985 ला बांग्लादेश अवैध इमिग्रेशनच्या विरोधात 6 वर्ष सुरू आहे. या आंदोलनाला आसाम आंदोलन म्हणून ओळखले जाते. बांग्लादेशच्या सीमेशी आसामचा 4,096 किमीचा हिस्सा लागून आहे.

आसाममध्ये मुसलमानांची संख्या 1961 मध्ये 23.3 %  होती. तर 2011 मध्ये ती संख्या वाढत जाऊन 34 %  झाली. हे आकडे 2011 च्या जनगणनेत  आहेत. परंतू या आकडेवारीमध्ये कोण आसामी, बंगाली किंवा बांग्लादेशी आहे हे काही स्पष्ट नाही.

आसाममध्ये अवैध पध्दतीने राहणाऱ्या बांग्लादेशींचा मुद्दा मोठा आहे. या कारणांमुळे आसाममध्ये अनेक वेळा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आसामचे मुळ नागरिक असणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, बाहेरून येणारे लोकांमुळे त्यांचे हक्क त्यांना मिळत नाहियेत. 80 च्या दशकात या मुद्दामुळे मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर आसाम गण परिषद आणि त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधीच्या सरकारमध्ये करार झाला होता. यामध्ये नक्की झाले होते की, 1971मध्ये जे कोणी बांग्लादेशी नागरिक आसाममध्ये घुसले आहेत त्यांना नागरिकता दिली जाईल. मात्र बाकीच्यांना निर्वासित म्हणजे बाहेर काढण्यात येईल. पंरतू या कराराविषयी पुढे काहीच झाले नाही.

24 मार्च 1971 तारीख का ?

ही तारीख 1985 च्या आसाम कराराशी निगडित आहे. त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधी सरकार आणि आसाम स्टूडेंड्स युनियन (एएएसयू) मध्ये हा करार करण्यात आला होता. त्यावेळी ही तारिख नक्की करण्यात आली होती.

खरे नागरिक कोण ?

आसामच्या नागरिकांची आणि त्यांच्या पुर्वजांची नाव 1951 च्या एनआरसीमध्ये असणे गरजेचे आहे. तसेच 24 मार्च 1971 च्या मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे.

आतापर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकार या विषयावर अपयशी ठरले आहेत.  2005 ला पुन्हा एकदा एनआरसी अपडेट करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा आसाममध्ये हिंसा झाल्याने हे काम थांबवण्यात आले.

31 डिंसेबर 2016 ला आसामच्या एनआरसीने पहिला ड्राफ्ट जाहिर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. सध्या सुप्रिम कोर्टात याविषयीची सुनावणी सुरू झाली आहे.

नागरिकत्व सिध्द करण्यासाठी ही कागदपत्रे धरली जाणार ग्राह्य – 

जन्माचा दाखला, जमिनीची कागदपत्र, शरणार्थी प्रमाणपत्र, शाळा-महाविद्यालयाची प्रमाणपत्र , पासपोर्ट, कोर्टाची कागदपत्र ही कागदपत्रे नागरिकत्व सिध्द करण्यासाठी गरजेची आहेत

एनआरसी ड्राफ्टमध्ये अशा पध्दतीने करण्यात येईल नावाची तपासणी –

1) एनआरसी सेवा केंद्रावर सकाळी 10 ते संध्याकाळी 4 च्या वेळेत जाऊन स्वतःचे नाव चेक करू शकतात.

2) www.nrcassa.nic.in आणि www.assam.gov.in या साईटवर जाऊन संपूर्ण माहिती तपासू शकतात.

3)घरी बसल्या बसल्या देखील तपासू शकता. त्यासाठी फक्त ARN टाइप करून 9765556555 नंबरवर पाठवू शकता.

4) फोन करून देखील लिस्टमध्ये नाव चेक करू शकतात. आसाममध्ये राहणारे लोकं 15107 वर काॅल करू शकतात. तसेच आसामच्या बाहेर राहणारे लोकं 18003453762 या नंबरवर काॅलकरून माहिती घेऊ शकतात.

Loading...

मी तुम्हाला माझा आधार कार्ड नंबर देतो; माझी माहिती हॅक करून दाखवा-‘ट्राय’ चेअरमन आर. एस. शर्मा

Previous article

आधारकार्ड नंबर देऊन हॅक करण्याचे दिले होते आवाहन; हॅकर्सने केले 1-1 रुपये बँक खात्यात जमा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *