मुख्य बातम्या

नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा ; गुलाबराव पाटलांचे एकनाथ खडसेंना आवाहन

0

“नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा”, असं आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना केले आहे . “मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
“एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचे कारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने रचले आहे. मात्र एकनाथ खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात, असे व्हायला नको. नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा”, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.
“माझ्यावर जी मीडिया ट्रायल झाली होती ,ते या बारभाई कारस्थानतूनच झाली. देवेंद्र फडणवीस यांनीच माझे तिकीट कापले. सर्व कटकारस्थान यांचेच आहे. मी सर्व बाबी नानासाहेब फडणवीस यांचे बारभाई कारस्थान या पुस्तकात देणार आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :-

‘ही बाळासाहेबांची शिवसेना उरलीच नाही’ ; कंगनाची आई कडाडली
बबड्याची सीरिअल पाहण्याऐवजी…’ ; रोहित पवारांनी शेलारांना सुनावले खडे बोल
वडिलांमुळे संपत्ती मिळू शकते पण सन्मान तुम्हालाच कमवावा लागतो ; कंगनाची मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीका
लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा उद्धव सरकारने घोटला?

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा ; गुलाबराव पाटलांचे एकनाथ खडसेंना आवाहन InShorts Marathi.

कुणामध्ये एवढी हिंमत आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखेल ?

Previous article

योगी आदित्यनाथांच्या ‘या’ निर्णयावर फडणवीस खुश ; जय जिजाऊ जय शिवरायचा केला जयघोष !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.