Royal politicsटॉप पोस्ट

सभेत शेतकर्‍यांवर बंदी आणि मोदी म्हणतायेत माझा अजेंडा विकास आणि फक्त विकास

0

राजस्थान:-

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यामुळे आता गड रखण्यासाठी पंतप्रधान मोदींचे राजस्थान द्वरे सुरू झाले आहेत. याचाच एक भाग होता आजचा मोदींचा राजस्थानातील जयपुर द्वरा. यावेळी राजस्थानात सरकार विरोधी चांगलाच आवाज उठवला जात आहे. राजपूत, शेतकरी, बेरोजगार तरुण यांची मोठी नाराजी आहे.

Loading...

या कारणाने मोदींच्या जयपूर जनसंवाद सभेला मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. ही सभा ‘आमरूदो का बाग’ येथे आयोजित करण्यात आली होती. यात ते राज्य आणि केंद्राच्या योजनांचे लाभार्थी असलेल्यांना संबोधित करणार होते आणि त्याची प्रतिक्रिया घेणार होते.

या सभात मोदींनी 2100 कोटीच्या विविध योजना जाहीर केल्या- 

नागौर, जोधपूर, धौलपूर आणि अलवर येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत तेथील लोकांना घरे बांधून देणार असल्याचे मोदींनी जाहीर करत या योजनेचे अनावरण केले. अजमेर, बीकानेर, सीकर, हनुमानगड, भीलवडा, माऊंट अबु येते जलपूर्ती योजना राबवण्यात येणार आहेत.

यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणल्या की, “आमचे हे लक्ष आहे की, प्रत्येक योजनेची अंमलबजावणी करून त्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचेल. जनधन योजनेमुळे प्रत्येक गरिबापर्यंत त्यांचा पैसा त्यांच्या पर्यंत पोहचवण्याच काम केला. आम्ही लाखो लाभार्थीपर्यंत योजना पोहचवल्या. ”

या वेळी राष्ट्रीय बाल स्वस्थ योजना, राजश्री योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पालनहार योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, कौशल्य योजना या सारख्या राज्य आणि केंद्रीय योजनांचा लाभ घेणार्‍या लाभर्थ्यांनी आपल्या कथा आणि अनुभव मोदींसमोर संगितले.

परंतू राजस्थान सरकारने राज्यातील कलेक्टर्सला आपल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सभेला आणण्याचे आदेश दिले होते. कलेक्टर्सने बारा, बुंदी आणि झालावाड या जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, बहुतेक शेतकर्‍यांनी लसूण आणि हरभर्‍याला सरकारकडून चांगले हमीभाव मिळाले नाहीत आणि खरेदी केंद्रावर अनेक गडबड चालू असल्याचे संगितले.

परंतु कोणत्याही परिस्थिती सभेला गर्दी आणा असे आदेश दिले होते. त्यामुळे भाजप वर विश्वास असलेल्यांचा शोध घेऊन  सभेला आणण्याची युक्ती  कलेक्टर्सकाढून लढवण्यात आली. असे असले तरी गर्दी कमी होईल याचा अंदाज बांधून नवीन उपाय शोधला गेला. की ज्या शेतकर्‍यांना पीक ऋण माफी योजना आणि कर्ज माफीचा लाभ झाला आहे अशा लोकांना सभेला गोळा करून आणण्याची शकल लढवली गेली.

अजेंडा विकास, विकास आणि विकास-

पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, ” राजस्थान विकासाच्या मार्गावर चालला आहे. तीन वर्षापूर्वी सॉइल हेल्थ कार्ड चा लाभ 14 कोटी 50 लाख रुपयापेक्षा जास्त शेतकर्‍यांना मिळाला आहे.  मागील 2 वर्षात 5 कोटी लोग गरिबीतून मुक्त झाले आहे.”

या पुढे ते असेही म्हणाले की, “यावेळी जे पीक शेतकरी पिकवतील, त्यासाठी लागलेल्या गुंतवणुकीच्या दीड पट जास्त फायदा शेतकर्‍यांना मिळेल, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत राजस्थानमध्ये 80 लाख शौचालये बांधण्यात आली. मुद्रा योजनेअंतर्गत राजस्थानमध्ये 44 लाख उद्योगांना कर्ज मिळाले. आमचा अजेंडा विकास, विकास आणि विकास आहे.”

“सबका साथ सबका विकास या अंतर्गत सगळ्याचा विकास आणि सगळ्यांना स्मार्ट बनवण्यासाठी सरकार 7 हजार कोटी रुपयांची मंजूरी करीत आहे.”

हडौती क्षेत्रातील शेतकरी शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला नाही म्हणून आणि हेच त्यांच्या आत्महत्येचे कारण ठरले असल्याने, कार्यक्रमात येऊन मोदींसमोर घोषणाबाजी करतील. म्हणून हडौती क्षेत्रातील शेतकरी सभेत येऊन आपली ‘मन की बात’ करून नयेत आणि राज्य सरकारचे देशात हसू होऊ नये म्हणून हडौती क्षेत्रातील शेतकर्‍यांना  सभेला येण्यास निषेधच केला होता.

Loading...

Fake News Alert : पोलिस तुमचे मेसेज पाहणार ? जाणून घ्या व्हाॅट्सअॅपवर फिरणाऱ्या या मेसेजची सत्यता

Previous article

का म्हणाले यशवंत सिन्हा की, पूर्वी मी लायक मुलाचा नालायक पिता होतो, परंतू आता…जाऊन घ्या काय आहे कारण

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *