Royal politicsटॉप पोस्ट

मोदींनी बहुमत जिंकले; पण राहुल गांधींनी मने जिंकली

0

तेलगू देसम पार्टी आणि अन्य अनेक विरोधी पक्षांनी काल लोकसभेत मोदी सरकार विरोधात अविश्वास दर्शक प्रस्ताव आणला होता. त्यावर लोकसभेचे चांगलेच रणांगण झाले. मोदी राहुल किस्सा तर भलताच रंगला. पण भाजप सरकार अग्नी परीक्षेत पास झाले.

काल संध्याकाळी 6 वाजता अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात येईल असे सांगण्यात आले पण रात्री उशिरापर्यंत लोकसभेचा वेळ वाढण्यात आला आणि बऱ्याच उशिरा रात्री 11.15 वाजता लोकसभेत मतदान झाले. लोकसभेत 543 खासदार संख्या असून अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या विरोधात 325 जणांनी मतदान केले तर अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने 126 जणांनी मतदान केले. सरकारच्या विरोधात कमी मतदान झाल्याने बहुमताचा आकडा सरकारने गाठला आणि अविश्वासदर्शक प्रस्ताव डळमळून पडला.

Loading...

शिवसेनेने या प्रक्रियेत भाग घेणार नसल्याचे सांगितल्याने शिवसेनेने मतदानच केले नाही. आणि आण्णा द्रमूक चे नेते देखील सभागृह सोडून गेले असल्याने एकूण 92 खासदार सदस्य अनुपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात खासदारांना अविश्वासदार्शक प्रस्ताव फेटाळून टाकण्याची विनंती केली होती. मोदींचे भाषण तब्बल 1.30 तास चालले.

लोकसभेत भाजप चे एकूण 273 खासदार आहेत आणि एनडीएचे एकूण धरून 313 खासदार संख्या आहे. तर मोदी सरकारला या मतदानात 325 खासदारांचे पाठबळ मिळाले. याचा अर्थ भाजपला 12 खासदारांची जास्त मत मिळाली. त्यामुळे आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की ही जास्तीची मते कोणत्या पक्षाच्या आमदारांनी दिली.

लोकसभा सुरू होण्याआधी भाजपकडून व्हीप जारी करण्यात आला होता. या व्हीप अन्वये भाजपच्या सर्व खासदारांना लोकसभेचे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

याच प्रकारचा व्हीप आम आदमी पार्टी कडून देखील काढण्यात आला होता. परंतू हा व्हीप मोदी सरकार विरोधात मतदान करण्यासाठी काढण्यात आला होता.

काल लोकसभेत अनेक उल्लेखनीय घडामोडी घडल्या. राहुल गांधींनी मोदींना दिलेली जादू की झप्पी, रामदास आठवले यांच्या कविता, सभापती सुमित्रा महाजन यांची विधाने, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण, आंध्रप्रदेश आणि बिहारची राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी या आणि अनेक..

काल लोकसभेत काय काय घडले या संबंधित बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

पहा व्हिडिओ : …. आणि राहुल गांधीनी लोकसभेत पंतप्रधान मोदींना दिली ‘जादू की झप्पी’

मोदी सरकार विरोधात अविश्वासदर्शक प्रस्ताव, आज काय काय झाल संसदेत हे नक्की वाचा

Loading...

मोदी सरकार विरोधात अविश्वासदर्शक प्रस्ताव, आज काय काय झाल संसदेत हे नक्की वाचा

Previous article

हिमाचल प्रदेश : तब्बल 50 वर्षांनी सापडला शहीद सैनिकाचा मृतदेह

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *