Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

ही दोस्ती तुटायची नाय.! चढा-ओढीच्या काळात ‘दोस्ताना’ आजही कायम.

0

करमाळा- मराठी चित्रपट ‘धुमधडाका’मधील गाणे असलेल्या ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या गाण्याचे उत्तम उदाहरण आता करमाळ्याच्या राजकारणात ही दिसू लागले आहे. शिवसेनेचे आमदार नारायण पाटील आणि कॉंग्रेस चे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी चढा-ओढीच्या काळात ही आपला दोस्ताना कायम ठेवलेला आहे.

नुकत्याच झालेल्या करमाळा बाजार समिती निवडणूकीत जगताप-पाटील गटाने एकत्र येऊन निवडणूक लढविलेली होती. सभापती निवडीवेळी ऐनवेळी जगताप-पाटील गटाचे संचालक शिवाजीराव बंडगर यांनी बंडखोरी केल्यामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा सभापती होण्याची मनसुब्याला सुरुंग लागला आणि बंडखोर संचालक शिवाजीराव बंडगर बागल गटातून बाजार समितीचे सभापती झाले.

Loading...

३ अॉक्टोबरला सभापती निवडी वेळी करमाळ्यात तणाव निर्माण झाला, बागल गटाचे आणि मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार करमाळा पोलिस ठाण्यात झाली माजी आमदार जयवंतराव जगताप त्याचे पुत्र करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्यासह १२ जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागण्यांसाठी बागल गटाने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे त्यांचे राजकीय जुने मित्र शिवसेनेचे आमदार नारायण पाटील त्यांच्या मदतीला धावून आले.राजकारणापलीकडे मैत्री जपणारे नारायण पाटील यांनी स्वतः  काल १२ अॉक्टोबरला करमाळ्यात धरणे आंदोलन केले.

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह १२ जणांवर राजकीय वैमन्यासातून गुन्हा दाखल केलेला असून तो लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा येत्या १९ अॉक्टोबरला आपण सामुहिक आत्मदहन करणार असल्याचा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला. माजी आमदार यांच्यावर बागल गटाच्या दबावापोटी पोलिसांनी ३०७ नुसार गुन्हा दाखल केलेला असल्याने त्यांचा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी करमाळ्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

Loading...

#MeToo :- लैंगिक शोषणाच्या आरोपांची तपासणी करण्यासाठी समितीची नेमणूक करणार- मेनका गांधी

Previous article

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : राष्ट्रवादीने दिलेला ‘हा’ प्रस्ताव कॉंग्रेसला मान्य होईल का ?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.