Royal Entertainmentमुख्य बातम्या

फँड्री आणि सैराटच्या अभुतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे घेऊन येत आहेत…

0

2013 मध्ये आलेला फँड्री आणि 2016 मध्ये आलेला सैराट या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत. त्यानंतर सर्वांनाच उत्सुकता होती ती म्हणजे नागराज मंजुळे यांच्या पुढील चित्रपटाची,झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

सैराट सिनेमाचे कॅमेरामन सुधाकर रेड्डी हे ‘नाळ’ या सिनेमाचे दिग्दर्शक करत आहेत, तर स्वतः नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. ‘माझ्याच मनातील गोष्ट सुधाकर सांगतोय’ असं म्हणत नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर नाळचा टीजर नुकताच शेअर केलाय. या टीजरला काही वेळात लाखात व्हूज मिळाल्या आहेत.

(Naal Nagraj Manjule Marathi Moive)
Loading...

(Naal Nagraj Manjule Marathi Movie)

नागराज यांच्या आधीच्या चित्रपटाप्रमाणे ‘नाळ’ सुद्धा काहीतरी भन्नाट आणि हटके कलाकृती असल्याचं टीजर वरून समजतंय. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत, त्यामुळे नाळचा ट्रेलर पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. 16 नोव्हेंबर ला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. फँड्री आणि सैराट प्रमाणे या ही चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

 


हे ही वाचा- 

#MeToo :- हाऊसफुल्ल 4 चे शुटींग रद्द; दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप

शार्दूल ठाकूरची पदार्पणात अनलकी सुरुवात 

Loading...

#MeToo :- हाऊसफुल्ल 4 चे शुटींग रद्द; दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप

Previous article

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, ‘या’ मंत्र्यांचा होऊ शकतो पत्ता कट

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *