Royal politicsटॉप पोस्ट

कर्नाटकमध्ये जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान मोदी कसे जबाबदार असतील?-प्रमोद मुतालिक

0

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी गौरी लंकेश, कुलबुर्गी याच्या हत्येबाबत खळबळ जनक विधान करून वाद निर्माण केला आहे.

“लोक सतत विचारात असतात की गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मोदी मौन का बाळगून असतात. याला उत्तर देताना त्यांनी कर्नाटकमध्ये जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान मोदी कसे जबाबदार असतील?” असा प्रश्न विचारत त्यांनी स्वत:वर वाद ओढवून घेतला आहे.

Loading...

मागील वर्षी 5 सप्टेंबर 2017 ला गौरी लंकेश यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या संबंधित कर्नाटक एसटीआय कडून चौकशी कण्यात येत आहे. यासंबंधी हिंदुत्ववादी संघटनेसंबंधित आरोपी परशुराम वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. मार्च 2018 मध्ये हिंदू युवा सेनेचा कार्यकर्ता नवीन कुमार याला अटक करण्यात आली होती.

कर्नाटक एसआयटी कडून सध्या राकेश मठ यांचा शोध घेण्यात येत आहे. मागील आठवड्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी परशुराम वाघमारे याचे  ‘ब्रेनवॉश’ केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याचे कर्नाटक एसआयटी कडून सांगण्यात आले.

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचा आरोपी परशुराम वाघमारे याच्या सोबत सध्या सोशल मीडिया वर फोटो वायरल होत आहे.

महाराष्टात नरेंद्र दाभोळकर, पानसरे आणि कर्नाटक मध्ये झालेल्या कुलबुर्गी यांच्या हत्येसंबंधित गूढ याच अटक  केलेल्या आरोपींकडून उखडून  निघेलअसे दिसत आहे. कारण  आरोपी परशुराम वाघमारे याने आपणच धर्म वाचवण्यासाठी गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे काबुल केले आहे. आणि कर्नाटक एसआयटी ला तपासात सापडलेली बंदुक नरेंद्र दाभोळकर, कुलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आले आहे.

यावर राहुल गांधी यांनी टीका करीत पंतप्रधान मोदींना, “प्रमोद मुतालिक यांनी केलेले गौरी लंकेश यांच्या बाबतचे वक्तव्य अत्यंत घृणास्पद आहे. आता यावर देखील पंतप्रधान गप्पच बसणार आहे का?” असा प्रश्न विचारलं आहे.

(PHOTO INPUT:-FACEBOOK)

Loading...

J&K:- दहशतवादी विरोधी कारवाया थांबवल्यानंतर देखील दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण वाढले

Previous article

अरविंद केजरीवाल यांना नायब राज्यपालांच्या कार्यालयात आंदोलन करण्याची परवानगी कोणी दिली – दिल्ली हायकोर्ट

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *