Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘बजरंगी भाईजान’ सिनेमातील मुन्नीची आई आहे बॉलिवूड अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयीच्या खास गोष्टी

0

बॉलीवुडमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. कुणाचं नशिब चमकेल, कुणी रातोरात स्टार बनेल किंवा कुणी क्षणात खाली आपटेल हे सांगणं अशक्य आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बड्या कलाकारांना सारेच ओळखतात. त्यांचे सिनेमा, त्यांची भूमिका प्रत्येक फॅनला माहिती असते.
आता बॉलीवुडचा दबंग खान सलमानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा सगळ्यांनीच पाहिला असेल. या सिनेमातील भाईजान सा-यांनाच भावला असेल.हा सिनेमा भाईजान आणि मुन्नीवर आधारित होता. मुन्नी साकारणारी चिमुकली हर्षाली मल्होत्रा पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या आईमुळे ती चर्चेत आहे. हर्षालीच्या आईचे नाव काजल मल्होत्रा आहे.
मुन्नी जितकी क्युट दिसते तिकीच तिची आई देखील खूप सुंदर आहे.रिअल लाइफमध्ये काजल खूप ग्लॅमरस आहे. तिच्या सौंदर्यावर रसिक फिदा झाले नाही तरच नवल. काजलने बॉलिवूडमध्ये भरपूर काम केले असून निर्माती म्हणून ती प्रसिद्ध आहे.
काजलचे पती विपीन मल्होत्रा व्यावसायिक आहेत.प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे ही काजलची खासियत आहे. याशिवाय मजामस्करी करणंही तिला तितकंच भावतं. तिचा हाच स्वभाव तिच्या फोटोंमध्येही पाहायला मिळतो.सोशल मीडियावर ती सक्रीय असून तिचे हर्षालीसोबतचे फोटो शेअर करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post ‘बजरंगी भाईजान’ सिनेमातील मुन्नीची आई आहे बॉलिवूड अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयीच्या खास गोष्टी appeared first on Home.

आज दहावीचा निकाल; शिक्षणावरील ‘या’ गोष्टी वाचाच, हसा चकटफू

Previous article

व. पु. काळे यांचे मजेशीर आणि उपहासात्मक कोट्स; नक्कीच वाचा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.