Royal politicsटॉप पोस्ट

पहा फोटो: मुंबईत पावसामुळे अंधेरीतील पूल कोसळला, मुंबईतील वाहतूक ठप्प

0

मुंबई:-

मुंबईमध्ये सतत जोर धरलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतुक मंदावली आहे. तर सतत रेल्वेने धावपळीची शर्यत करणार्‍या मुंबईकरांना पावसामुळे हैराण करून सोडले आहे. हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे की अजून 2 दिवस तरी पाऊस असाच सुरू राहील.

Loading...

त्यातच सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान अंधेरी – विले पार्ले वेस्ट येथील रेल्वे स्टेशन लगतच्या  फुटपाथ असलेला गोखले ओवर ब्रिजचा काही भाग कोसळल्याने रेल्वे वाहतूक  बंद करण्यात आली आहे. याचा परिणाम इतर रेल्वेच्या वेळेवर होत आहे.

   पूल पाडलेल्या स्टेशन मधील दृश – यावरून लक्षात येते की, या दुर्घटनेत किती नुकसान झाले असेल 

या दुर्घटने नंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था ठप झाली होती.

या ब्रिज पडल्यामुळे 5 लोक जखमी झाले आहेत. यात 1 महिला देखील सहभागी आहे, तर एनडीआरएफ ची टीम तेथे दाखल झाली होती आणि दुर्घटनेत जखमी लोकांना वाचवण्याचे काम करण्यात आले. जखमींना जवळ च्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत जखमी लोकांची नाव-

अस्मिता काटकर,  हरिष कोहटे, मनोज मेहता,  गिंधमणी सिंह, द्वारका प्रसाद  

राहुल गांधी यांनी या दुर्घटने बाबत मुंबई महानगर पालिकेवर निशाणा साधला आहे.

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, आणि रेल्वे रुळावर जमा झालेला मातीचा ढीग हटवण्याचे देखील आदेश दिले आहेत. तसेच जखमींना 1 लाख रुपयांची मदत करण्यात येईल असे संगितले आहे.

तसेच संपूर्ण मुंबईमध्ये पावसाने जोर कायम धरला आहे. या मुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले आहे.

Loading...

ही बातमी वाचून तुम्ही जीमेल वापरणं बंद कराल

Previous article

कोण गाजवणार ‘दिल्ली’वर सत्ता? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *