मुख्य बातम्या

मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीमधील फ्लॅट बळकावलेत : किरीट सोमय्या

0

वरळीच्या गोमाता जनता SRA सोसायटीमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा मारल्यानंतर भाजपाने आता शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अनाधिकृत बांधकामे उघड करण्याचं काम सुरु केले आहे.
वरळीतील गोमाता SRAमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कॉर्पोरेट कंपनीच्या नावाखाली बळकावला आहे. पेडणेकर यांनी एसआरए योजनेअंतर्गत गोमाता जनता सोसायटीमधील केवळ ऑफिसच नाही तर फ्लॅटही लाटला. त्यांच्या कुटुंबाच्या किश कॉर्पोरेट कंपनीने तळमजल्यावर सोसायटीच्या कार्यालयासाठी राखीव असलेली जागा लाटली, असा आरोप सोमय्या यांनी केला.
किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडे दिलेल्या कागदपत्रात त्यांचा पत्ता आणि कॉर्पोरेट कंपनीचा पत्ताही एसआरएमधील इमारतीतला आहे. याबाबत माझ्याकडे सगळे कागदपत्रे आहेत त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करावी असं चॅलेंज किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

Mayor Kishori Pednekar captured illegally Residential Flat in Building No 2 & Office (Kis Corporate Services) in Bldg 1 of Gomata Janata SRA Society Worli Flat alloted to Slum Rehab Person & Office alloted to Gomata SRA Housing Society Office This SRA project now belongs to BMC pic.twitter.com/JGR1J2lUX3
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 12, 2020

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीमधील फ्लॅट बळकावलेत : किरीट सोमय्या InShorts Marathi.

अभिमानाने सांगा मनसे नेमकं काय करतेय ; व्हिडिओच्या माध्यामातून विरोधकांना प्रत्युत्तर

Previous article

लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.