मुख्य बातम्या

‘मुंबई,मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या कंगनाला राज्यपाल तातडीने भेटले याचा खेद वाटतो’

0

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कगंना रानौतने मुंबई, महाराष्ट्र, मुंबई पोलीस यांच्याबद्दल केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण तापलं होतं. कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केल्यानंतर तिच्यावर विविध माध्यमातून टीका होत आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली होती. याचदरम्यान कंगनाने मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी, राज्यपालांनी कंगानाला तातडीने भेट दिली याचा खेद वाटत असल्याचं म्हणत, राज्यपालांवर कसला दबाव होता का, असा सवालही केला आहे.

म्हणूनच मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना राणावतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो.महामहीमांवर दबाव होता का? हा संदेह जनतेत आहे. असो!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 19, 2020

मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन अपमान करणाऱ्या कंगनाला राज्यपालांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटत असल्याचं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.
महामहीम राज्यपाल उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत. तसेच ते संविधानाच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा रक्षणाची जबाबदारी राज्याचे प्रमुख राज्यपालांची असते.
महत्वाच्या बातम्या :-

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खासदारांच्या पगारात होणार ३० टक्के कपात !
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! लोकलच्या १५० फेऱ्या वाढवल्या !!
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘मुंबई,मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या कंगनाला राज्यपाल तातडीने भेटले याचा खेद वाटतो’ InShorts Marathi.

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करुन त्यांना पुन्हा नागपुरात आणा ; शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Previous article

लॉकडाऊनमुळे देशात तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार , वाचा धक्कादायक माहिती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.