Royal Entertainmentटॉप पोस्ट

Mulk Trailer: प्रत्येक मुसलमान हा देशद्रोही नसतो, हा थ्रिलिंग कोर्ट रूम ड्रामा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल

0

तापसी पन्नू आणि ऋषी कपूर यांची प्रमूख भुमिका असलेल्या ‘मुल्क’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये दोंघाचीही अॅक्टिंग दमदार दिसून येतीये. हा ट्रेलर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा विचार करायला लावेल. देशभक्ती, मुलमान, दंगे, जिहाद आणि प्रत्येक मुसलमान हा देशद्रोही नसतो या सारख्या अनेक गोष्टी या ट्रेलरमध्ये पहायला मिळतात.

ट्रेलर विषयी सांगायचे तर, बाॅम्ब स्फोटाच्या घटनेवर हा चित्रपट आहे. प्रतिक बब्बर(शाहिद) एका टेररिस्टच्या भूमिकेत आहे. मुलगा या घटनेत सहभागी झाल्यानंतर त्या कुटूंबाला कोणत्या परिस्थितीतून जावे लागते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

Loading...

त्या कुटूंबावरही देशद्रोही असल्याचे आरोप लावण्यात येतात. प्रत्येक मुसलमान हा देशद्रोहीच असतो असे सांगण्यात येते. आणि हेच स्वतः वरील आरोप खोडण्यासाठी ऋषी कपूर म्हणजेच मुराग अली मोहम्मद हा लढा देतो.

ऋषी कपूर आणि त्यांच्या कुटूंबावरील देशद्रोहाचे आरोप खोडून काढण्यासाठी लढा देणाऱ्या वकिलाच्या भूमिकेत तापसी पन्नू आहे.

तापसी पन्नू आणि ऋषी कपूर यांच्या व्यतरिक्त प्रतिक बब्बर, आशूतोष राणा, कुमूद मिश्रा, रजत कपूर आणि मनोज पाहवा अशी मोठी स्टार कास्ट आहे.

हा असा चित्रपट आहे जो खर तरं 15 आॅगस्ट ला रिलीज व्हायला हवा.

अनूभव सिन्हाने हा चित्रपट डायरेक्ट केला आहे. त्याने आधी ‘तूम बिन’, ‘रावन’ हे चित्रपट डायरेक्ट केले आहेत. तसेच दिपक मूकूट आणि अनूभव सिन्हा या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत.

3 आॅगस्टला हा चित्रपट सर्वत्र रिलीज होणार आहे. याच दिवशी इमरान खानची प्रमूख भुमिका असलेला ‘कारवां’ आणि अनिल कपूर, एेश्वर्या राय बच्चन आणि राजकूमार राव यांची प्रमूख भुमिका असलेला ‘फन्ने खां’ देखील रिलीज होणार आहे.

Loading...

जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा सत्ता स्थापनेचा खेळ? कोण होणार मुख्यमंत्री?

Previous article

खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा एक्सप्रेस हायवेचे हे आहे सत्य, जाणून घ्या

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *