Royal politicsटॉप पोस्ट

पुण्यात मुठा कालव्याची भिंत फुटली, 50 घरांचे नुकसान; पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा नडला

0

पुणे- शहारच्या वर्दळीच्या भागात आज दुपारी 11.45 च्या सुमारास मुठा नदीचा कालवा फुटून दांडेकर पूल आणि परिसर पुरता जलमय झाला. जनता वसाहत असलेल्या दाट वस्तीत घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे संसार उधवस्त झाले आहे. घराघरात अचानक पाणी शिरल्याने आणि पुरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांमध्ये तणावाचे वातावरण पसरले होते.

पुण्यातील जनता वसाहती जवळून जाणारा मुठा नदीच्या कालव्याच्या भिंतीला अचानक भगदाड पडल्याने पाण्याचा मोठा लोट परिसरात पसरला. काही वेळाने ही भिंत कोसळल्याने वर्दळीचा दांडेकर पुल देखील पाण्याखाली गेला. पर्यायी रस्ता बंद झाल्याने त्याला लागून असलेल्या सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. तर जनता वसाहतीत पाणी शिरले. रस्त्यावरील वाहनांचे देखील नुकसान झाले आहे तर काही वाहने वाहून गेली आहेत. घरांचे आणि साधनांचे मोठे नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Loading...

भरवस्तीत पाणी शिरल्याने सतर्कतेचा इशारा म्हणून कालव्या लगत राहणार्‍या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. संसारच्या संसार वाहून गेल्याने लोकांमध्ये निराशा देखील आहे.

सोशल मीडियावर अफवा-

खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे इतर तालुक्यांना पाणी पुरवठा करणारा हा कालवा फुटल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सोशल मीडियावर लगेचच ही घटना वार्‍यासारखी पसरली. ‘पुन्हा पानशेत’ अशा प्रकारच्या अफवा देखील पसरल्या.  या घटनेत लाखो लीटर पाणी वाळया गेले आहे.

घटना घडल्यानंतर आपत्कालीन सेवा मिळण्यास नागरिकांना बराच वेळ वाट पहावी लागली. यामुळे नागरिकांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला घेराव घातला. वेळोवेळी कालव्याच्या सुरक्षा भिंतीची देखरेख पालिकेकडून करण्यात न आल्याचे ही परिस्थिती उद्भवल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. यामुळे कालव्याच्या कामाच्या दर्जा बाबतचे प्रश्न पुणेकरांकडून पालिका प्रशासनाला विचारले जात आहेत.

mutha canal burst

mutha canal burst

खडकवासाला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला असून, नागरिकांनी घाबरून नये असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून करण्यात आले आहे.

भाजप विरोधी घोषणाबाजी-

मुक्ता टिळक यांनी घटना स्थळाची भेट घेतली. ‘पालिकेने कायमच पाटबंधारे खात्याला या कालव्याच्या भिंती धोकादायक असल्याचे संगितले, परंतु पाटबंधरे खात्याच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी संगितले.’ या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे देखील त्या म्हणल्या.

घटना घडल्यावर संबंधित आपत्कालीन यंत्रणा देखील वेळेत न पोहचू शकल्याने लोकांमध्ये रोष होता. त्यांनी मुक्ता टिळक यांना घेराव घालत भाजप विरोधी घोषणा दिल्या. निवडणुकीत मतं मागायला येतात परंतु अडचणीच्या वेळी कोणीही येत नाही असा आरोप देखील नागरिकांकडून करण्यात आला.

जलसंपदा विभाग पथक, अग्निशामक दल आणि पालिका प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. 50 हून अधिक घरांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पुनर्व्यवस्थापन लवकरात लवकर करण्यात येईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Loading...

PNB Scam :- पळकुट्या नीरव मोदीचा ज्या बँक शाखेत झाला होता घोटाळा त्याच बँकेत पुन्हा नवीन घोटाळा उघड

Previous article

सबरीमाला मंदिर :- लिंगाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही, मंदिरातील महिलांवरील प्रवेशबंदी हटवली

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *