खेळटॉप पोस्ट

‘धोनी सारखे आमच्याकडे 11 खेळाडू, प्रत्येकाच्या आयुष्यावर एक चित्रपट निघू शकतो’

0

देहरादून (उत्तराखंड) :- 

ज्याप्रमाणे भारताकडे धोनी आहे, त्याच्या संघर्षाची कहानी संपूर्ण जगाला माहित आहे. त्याचप्रमाणे आमच्या संघात देखील धोनीसारखे 11 खेळाडू आहेत. ज्यांनी इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यावर एक चित्रपट निघू शकतो, असे अफगाणिस्तानचा खेळाडू शराफुद्दीन अश्रफने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये  म्हटले आहे.

Loading...

शराफुद्दीन अश्रफ म्हणाला की, “आमच्या वरिष्ठ खेळाडूंनी आमच्यापेक्षाही अधिक संघर्षाना सामोरे जावे लागले आहे. आज त्यांंच्यामुळेच आम्हाला चांगल्या सोयी, सुविधा मिळत आहेत व त्यांच्यामुळेच आज आम्ही येथे पोहचलो आहोत.”

बांगलादेशविरूध्द सुरू असलेल्या मालिकेविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, “बांगलादेशविरूध्दची सिरीज आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. टी-20 वर्ल्ड कप जवळ आला आहे. त्यामुळे आम्हाला आयसीसी रॅंकिग वाढवणे गरजेचे आहे.”

तसेच भारताविरूध्द होणाऱ्या टेस्ट मॅच विषयी तो म्हणाला की, “भारत हा बलाढ्य संघ आहे. भारताला भारतात हरवणे अवघड आहे; पण आमच्याकडे राशिद खान व मुजीबुर रहमान सारखे चांगले स्पिनर्स आहेत. त्यामुळे मॅच नक्कीच चुरशीची होईल.

अफगाणिस्तानची भारताविरूध्द होणारी एकमेव टेस्ट मॅच 14 जूनला बेंगलोर इथे होणार आहे. अफगाणिस्तानची ही पहिलीच टेस्ट मॅच असणार आहे.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/AFGANISTANCRICKETBOARD)

Loading...

POEM : स्वच्छ नि सुंदर हरित भारत

Previous article

या देशाने दिले महिलांना पहिल्यांदाच ड्रायव्हिंग लायसन्स

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ