मुख्य बातम्या

MPSCने जाहीर केली नवीन गुणपद्धती ; केला ‘हा’ मोठा बदल

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSCने नवीन गुणपद्धती जाहीर केली आहे. एपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता चार चुकीच्या उत्तराबद्दल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मकता गुणांची पद्धत होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे.
MPSC ने लागू केलेल्या २००९ च्या नकारात्मकता पद्धती बदल केला आहे. यापूर्वी प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता १/३ एवढे गुण वजा करण्याची पद्धत होती. आता, नवीन नियमानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत.
एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरामधून २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. वरील नियम लागू करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकांत आली तरीही ती अपूर्णांकांतच राहील. तसेच एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, आहे प्रकारची नकारात्मकता गुणांची पद्धत लागू होणार नाही.
नवीन गुणांची पद्धत MPSCने जाहीर केलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरिता लागू असणार आहे. अशी घोषणा MPSC च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करणार ; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. MPSCने जाहीर केली नवीन गुणपद्धती ; केला ‘हा’ मोठा बदल InShorts Marathi.

शूटिंगच्या सेटवर अजयच्या या सवयीने करिना खूप अस्वस्थ व्हायची, म्हणाली की जेव्हाही आम्ही सोबत असे तेव्हा तो असे करायचा.

Previous article

उद्धव साहेब आतातरी घराबाहेर पडा, नगरसेवक गाड्या फोडतात आता नागरिक देखील फोडतील…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.