मुख्य बातम्या

पोलीस भरतीवरुन खासदार संभाजीराजे ठाकरे सरकारवर संतापले, म्हणाले “ही तर ….

0

महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या पोलीस भरतीला खासदार संभाजी राजे यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली असताना नोकर भरती करणे म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखे असल्याचं मत खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केलं.
ठाकरे सरकारच्या या निर्णय़ामुळं मराठा समाज पेटून उठला असून, पोलीस भरतीचा निर्णय चुकीच्याच वेळी घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘मराठा समाज व्यतिथ असताना नोकरी भरती का काढली?’, असा थेट सवाल त्यांनी केला. शिवाय राज्य शासनानं भरतीचा घेतलेला हा निर्णय म्हणजे एक प्रकारे सरकारकडून मराठा समाजाला दिलेली चिथावणी असा तीव्र नाराजीचा सूर त्यांनी आळवला.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाऊ नये अशी मागणी करत हे आरक्षण टीकवण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत यासाठी संभाजी राजे आग्रही दिसले.
एकिकडे सरकार आरक्षणासाठी बैठका घेत असताना दुसरीकडे मात्र मोठ्या संख्येनं नोकर भरतीही काढली जात आहे ही परिस्थिती मांडत एकंदर राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पाहता थोडे दिवस थांबायला काय हरकत आहे असा खडा सवाल त्यांनी केला. इतकंच नव्हे, तर कोरोना काळात भरती प्रक्रिया नेमकी का आणि कशी राबवली जाते हा मुद्दाही उपस्थित करत; मास्क घालून भरती करणार तरी कशी असा प्रश्नार्थक सूर त्यांनी आळवला.
महत्वाच्या बातम्या :-

मराठा आरक्षणाबाबत पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल ; शिवेंद्रराजे भोसले कडाडले
.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले
उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी तसूभरही मागे हटणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Loading...

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पोलीस भरतीवरुन खासदार संभाजीराजे ठाकरे सरकारवर संतापले, म्हणाले “ही तर …. InShorts Marathi.

Loading...

उर्मिला मातोंडकर अॅक्टिंगपेक्षा सॉफ्ट पॉर्नसाठी जास्त परिचित ; कंगनाची जीभ घसरली

Previous article

दशकांच्या प्रतीक्षेनंतर भारतात परतणार राम-लक्ष्मण- सीतेच्या चोरीला गेलेल्या मूर्ती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.