Royal politicsटॉप पोस्ट

महिला देशात सुरक्षित नाहीत- जया बच्चन

0

देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असताना पुरोगामी देशाला या घटना अत्यंत लाजिरवण्या आहेत. आणि याचर कारणाने खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत काल संताप व्यक्त केला. काल 2 दिवसापूर्वी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी आपले संताप जनक मत व्यक्त केले.

काल राज्यसभेत केंद्रीय महिला आणि बाल विकास राज्यमंत्री विरेंद्र कुमार यांनी देशात महिला विरोधी वाढणार्‍या अत्याचारावर आकडेवारी मांडली. त्यांनी मांडलेल्या या आकडेवारीच्या कारणाने सभात वाद सुरू झाला. यामुळे खासदार जया बच्चन देखील संतापल्या.

Loading...

त्यानंतर मागील आठवढ्यात आलेल्या थॉमसन रॉयटर्सचा अहवाल समोर मांडत भारत महिलांच्या अत्याचाराच्या घटनांबाबत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे जया बच्चन म्हणल्या. तसेच विरेंद्र कुमार यांनी मांडलेली आकडेवारी ही 2015 पर्यंतची आहे. ती आताची नाही. 2016, 2017 आणि 2018 या 3 वर्षात मुलींवर महिलांवर झालेले अत्याचार तुम्ही विसरलात का ?  असा प्रश्न करत त्यांनी कुमार यांची कान उघडणी केली.

त्या पुढे म्हणल्या की, मुलींचे तस्करीचे प्रमाण अधिक वाढत आहे. कटूआ प्रकरणाबद्दल तुम्ही सविस्तर अहवाल देऊ शकतात का? आणि सरकार देशात वाढत चाललेल्या महिलांवरील वाढत जाणार्‍या अत्याचाराविरोधात श्वेतपत्रिका जारी करणार का? असे प्रश्न जया बच्चन यांनी राज्यसभेत सरकार समोर उपस्थिती केले.

थॉमसन रॉयटर्सचा अहवालाचा उल्लेख जया बच्चन यांनी केल्यानंतर राज्यमंत्री विरेंद्र कुमार यांनी बचावार्थ उत्तर दिले की, थॉमसन रॉयटर्स या संस्थेने जो अहवाल प्रकाशित केला आहे. त्या बाबत आमच्याशी त्यांनी कोणताही संपर्क साधला नाही. या आकडेवारीचा नेमका आधार काय आहे ते आम्हाला माहीत नाहीत.

हे बोलताना कुमार यांना थांबवत जया बच्चन म्हणल्या की, रोज देशात अशा घटना रोज घडतात, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही काय केलेत? जे रोजचं घडत आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? कटूआ प्रकरणाबद्दल तुम्ही काहीच माहिती का देत नाहीत? असे संताप जनक सवाल राज्यसभेत जया बच्चन यांनी उपस्थित केले.  

हे ही नक्की वाचा- 

एका ट्विटमुळे रोखली गेली 26 मुलींची तस्करी, ‘सोशल मीडिया’चा सजग वापर

‘भारत महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देश’ थॉमसन रॉयटर्सचा अहवाल; राष्ट्रीय महिला आयोगा’ने फेटाळला

Loading...

100 रुपयाची नवीन नोट लवकरच व्यवहारात येणार; कशी आहे ही नोट? जाणून घ्या

Previous article

काय असतो अविश्वास प्रस्ताव? मोदी सरकारवर याचा किती परिणाम होईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *