खेळटॉप पोस्ट

यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने या खेळाडूला भारतीय संघातून वगळले

0

मागील काही दिवसापासून खेळाडूंच्या फिटनेसविषयी बीसीसीआयने अनेक कठोर नियम लागू केले आहेत. यो-यो टेस्टमध्ये पास झाल्याशिवाय खेळाडूंची संघात निवड न करण्याचे कडक धोरण बीसीसीआयने लागू केले आहे.

आता त्याच यो-यो टेस्टमध्ये अपयशी झाल्याने भारताचा तेच गोलंदाज मोहम्मद शमीला अफगाणिस्तानविरूध्द होणाऱ्या एकमेव टेस्ट मॅचमधील आपले स्थान गमवावे लागले आहे. बंगळूर येथील नॅशनल क्रिकेट अॅकडेमी येथे झालेल्या यो-यो टेस्टमध्ये मोहम्मद शमी अपयशी ठरला आहे.

Loading...

शमीच्या जागी आता दिल्लीच्या नवदीप सैनीला टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. सैनीने रणजी ट्राॅफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दिल्लीकडून खेळताना सैनीने रणजी ट्राॅफीच्या 8 मॅचमध्ये 34 विकेट घेतल्या होत्या तर विजय हजारे ट्राॅफीच्या 6 मॅचमध्ये 8 विकेट घेत चांगली कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये तो राॅयल चॅलेजर बेंगलोर संघात आहे;पण या वर्षी त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

शमीने दुखापतीमुळे आयपीलमध्ये दिल्लीकडून खेळताना 4 सामन्यात केवळ 3 विकेट घेतले होते. दुखापतीमुळे 31 मै रोजी झालेल्या  वर्ल्ड इलेव्हन व वेस्ट इंडिज यांच्यामध्ये लाॅड्स येथे झालेल्या चॅरेटी मॅचमध्ये खेळण्याची संधी देखील गमावली होती.

तसेच अफगाणिस्तान विरूध्द होणाऱ्या एकमेव टेस्टमॅचमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार असून हा सामना 14 जून ते 18  जून रोजी खेळला जाणार आहे.

अफगाणिस्तान विरूध्दच्या मॅचसाठी भारतीय संघ – 

अजिंक्य रहाणे(c), शिखर धवन, मुरली विजय, केएल राहूल, चेतेश्वर पुजारा, करूण नायर, दिनेश कार्तिक(wk), आर. आश्विन, रविंद्र जडेजा, कुलदिप यादव, उमेश यादव, नवदिप सैनी, हार्दिक पांड्या, इंशात शर्मा, शार्दुल ठाकूर

(PHOTO INPUT – FACEBOOK/MOHMAADSHAMI)

Loading...

गोरखपूर दुर्घटना प्रकरणातील डॉ. कफील खान यांच्या भावावर आज्ञातांकडून गोळीबार

Previous article

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर आम्ही भाजपसाठी प्रचार करु, नाहीतर…

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ