Royal politicsभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

‘संजय निरुपम परप्रांतीय भटका कुत्रा’, मनसेची पोस्टरबाजी

0

मुंबई : उत्तर भारतीयच मुंबई चालवतात. त्यानी काम बंद केले तर मुंबई ठप्प होईल, असे वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले आहे. निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असून, परप्रांतीय मतांवर डोळा ठेवून ते अशी विधाने करत आहेत, अशी पोस्टरबाजी मनसेकडून सोशल मीडियावर केली आहे.

मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केले नाही तर मुंबई थांबेल, असं वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं. नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेमध्ये निरुपम यांनी ही धमकी दिली आहे. नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाले संजय निरूपम ?
“लक्षात ठेवा उत्तर भारतीय वर्ग महाराष्ट्र चालवतो… मुंबईला चालवतो… दूध, भाजी, वर्तमानपत्र विकून आणि ऑटो टॅक्सी चालवून उत्तर भारतीय समाजच मुंबईकरांचे जीवन चालवितो… उत्तर भारतीय समाज स्वतःच्या खांद्यावर मुंबईकरांचे ओझे वाहतो… जर एके दिवशी उत्तर भारतीयांनी ठरवलं की आज कामावर जायचं नाही आणि फक्त एक दिवस काम केलं नाही तर पूर्ण मंबई ठप्प होईल… मुंबईच्या लोकांना जेवायलाही मिळणार नाही… आमची तशी इच्छा नाही… मात्र त्यासाठी आम्हाला मजबूर करू नका,” अशी धमकीच संजय निरुपम यांनी दिली.

MNS का एक गुंडा आज फिर पिटा ! संजय निरुपम यांच्या उलट्या बोंबा

८ नोव्हेंबरला भाजपा सरकारचे श्राध्द घालणार – संजय निरुपम

संजय निरूपम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ

Loading...

युती तुटल्यास भाजपा–शिवसेनेचा पराभव अटळ : मुख्यमंत्री

Previous article

लीड तोडणारा कोणी असेल तर साताऱ्यातून आपली माघार : उदयनराजे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.