Royal politicsटॉप पोस्ट

Accident- कृषि विद्यापीठाची बस 600 फुट खोल दरीत कोसळून 32 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता

0

महाराष्ट्रात आज एक अत्यंत वेदनादायी घटना घडली ज्यात बस 600 फुट दरीत कोसळून तब्बल 8 प्रवाशांचा मृत्यू झाला. आणि  हा आकडा आणखी वाढू शकतो. ही घटना रायगड पोलादपूरच्या घाटात घडली असून पिकनिकसाठी निघालेल्या दापोली कृषि विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यात बस ड्रायव्हरसह एकूण 33 जण होते, त्यातील फक्त एकाच व्यक्ती बचावला आहे असा अंदाज आहे.  या अपघातात दगावलेले बहुसंख्य कर्मचारी दापोलीचे आहेत.

महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी  विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस  पोलादपूरच्या घाटात सकाळी कोसळली. रायगडच्या दाभळी टोक इथे ही घटना घडली आहे. ३३ पैकी १ जण बचावला.  बस कोसळत असताना एका कर्मचार्‍याने या बसमधून बाहेर उडी मारली. त्यानंतर कसेबसे बाहेर येऊन त्याने अपघात झाल्याचे विद्यापीठाला कळवले. हा अपघात सकाळी 10.30 च्या दरम्यान झाला  असून गाडी 600 फुटापेक्षा जास्त असलेल्या दरीत कोसळली.

Loading...

हा घाट अत्यंत धोकादायक मनाला जातो. परंतू हा अपघात जेथे झाला ते अपघातचे ठिकाण नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची तपासणी चालू असली तरी अजून अपघात कसं झाला हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती पोलादपूर व महाबळेश्वर पोलिसांना कळताच ते लगेचच  घटनास्थळी पोहचले.

पिकनिकला गेलेल्या कर्मचार्‍यांचा फोटो

दरवर्षीच दापोली कृषी विद्यापीठाची पावसाळ्यात पिकनिक  जाते  ती या वर्षी देखील गेली होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास हे सगळे कर्मचारी पिकनिकसाठी निघाले.  सकाळी १०.३० च्या सुमारास एका कर्मचाऱ्याने विद्यापीठात बसचा अपघात झाला असल्याचे कळवले.

प्रकाश सावंत असे अपघातात बचावलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. अपघात घडतावेळी त्यांनी गाडीतून उडी मारली. गाडी दरीत कोसळताना अनेक जण गाडीतून बाहेर फेकल्या गेल्याने झाडात अडकले.

सध्या बचाव पथक अपघातातील प्रवाशांना बाहेर काढत आहेत, आतापर्यंत 8 मृतदेह हाती लागले आहेत. परंतू अपघात एवढा भयानक होता की बसचा पूर्णता चक्कचुर झाला आहे. त्यामुळे कोणी वाचेल याची शक्यता कमीच आहे. सततच्या पावसामुळे बचाव करण्यात अडथळा येत आहे. महाबळेश्वर येथील ट्रेकर्सही मुसळधार पाऊसात बचावाचे काम करीत आहे. घटनास्थळी  लोकांनी  गर्दी केली आहे.

Loading...

पाकिस्तान निवडणुकीत हा ‘हिंदू’ उमेदवार झाला विजयी

Previous article

एक असा देश जेथे पेट्रोल मिळते फक्त 50 पैशात !

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *