Royal politicsटॉप पोस्ट

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दुधाच्या दरात वाढ करण्याची मागणी

0

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन थांबला काही तयार नाहीत.  सरकारला शेतकरी प्रश्न सोडवण्यात यश येत नसल्याचे दिसायला लागले आहे. आधी शेतकरी संघटित नव्हते त्यामुळे आपल्या मागण्यासाठी ते येवढ्या मोठ्या संख्येने कधी रस्त्यावर उतरत नव्हते. परंतू मागील काही काळापासून शेतकरी संघटित होऊन आपल्या मागण्या सरकार समोर मांडत आहे.  यावेळी देखील दुधाच्या दरामध्ये वाढ करण्याच्या मागणीसह शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

राज्यात आजपासून म्हणजे 16 जुलै पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अनेक मागण्याच्या पूर्ततेसाठी दुध संकलन बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे आणि शहरांकडे जाणार्‍या दुधाची कोंडी करण्यात येणार आहे. आणि मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संप तीव्र करण्याचा इशारा देखील दिला आहे. 

Loading...

कारण राज्यातून बाहेर देशात होणारी दुधाच्या पदार्थांची निर्यात एकदम संकटात आली आहे.  आणि याचे कारण देशावर असलेला  अंतराराष्ट्रीय दबाव हे आहे. रशियाकडून दुधाच्या पदार्थाची आणि दूध पावडरची मागणी असताना अंतराराष्ट्रीय दबावामुळे देशातील दुधयुक्त पदार्थांची निर्यात होत नाही. दोन राष्ट्रात म्हणजे अमेरिका आणि रशिया या देशात असलेल्या वादामुळे रशियात दूध आणि दूध पदार्थ निर्यात करण्यावर अमेरिकेतून बंदी घालण्यात आली आहे.

यामुळे रशिया इतर देशांकडून दूध आयात करण्याच्या प्रयत्नात आहे. पण अमेरिकेकडून वाढणार्‍या दबावामुळे  भारत रशियाला दूध निर्यात करू शकत नाही.

राज्यातील दुधाचे भाव देखील ओतू गेले आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रति लीटर 5 रुपये देण्याची मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.  काल रात्री सोमवार पासून आंदोलन सुरू करण्यात येईल आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले. परंतू कालच शेतकरी कार्यकर्त्यांनी दुधाने भरलेले ट्रक अडवण्यास सुरुवात केली. कर्नाटक वरून पश्चिम महाराष्ट्रात येणार्‍या दुधाचा ट्रक अडवून ट्रकचे टायर जाळण्यात आले.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातून मुंबईकडे जाणारे दुधाचे ट्रक अडवण्यात येणार आहे. एवढेच नाही तर बाहेरील राज्यातून कर्नाटक, गुजरात मधून दुधाचे ट्रक येऊ नये याची आंदोलकांकडून तयारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात रोज सव्वा दोन कोटी लिटरचे दूध उत्पादन होते. एवढे उत्पादन असताना निर्यात कराव्या लागणार्‍या टेट्रापॅकची सोय कोणत्याही दूध संघाकडे नाही. तर मागील वर्षी दूधला 27 रुपये प्रति लीटर एवढा दर देण्याची सक्ती दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी केली होती, पण प्रत्यक्षात 16 – 17 रुपये प्रति लीटर एवढाच दर देण्यात आला. यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

यावर उपाय म्हणून राज्यसरकारकडून निर्यात होणार्‍या दुधाला अनुदान देण्याची योजना आणली आहे. परंतू ती प्रत्यक्षात येईल की नाही याबाबत शंका असल्याचे दूध उद्योगांकडून सांगण्यात येत आहे.

सरकारला सुबुद्धी यावी म्हणून आज सकाळी राजू शेट्टी यांनी पुण्यातील दगडूशेट मंदिरात दुधाचा अभिषेक करून साकडे घातली.

Raju Shetty in pune

भारताकडून 2017-18 या वर्षात दूधयुक्त पदार्थांची सर्वात जास्त निर्यात सौदी अरेबिया, भुतान, अफगाणिस्थान, नेपाळ, सिंगापूर, बांग्लादेश या देशात होते.

Loading...

जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती आणि भाजपमध्ये गुंफले शाब्दिक युद्ध; काय आहे कारण जाणून घ्या

Previous article

मंदिरांवर चर्चा करून रोजगार निर्माण होणार नाही:- सॅम पित्रोदा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *