Royal Entertainmentटॉप पोस्ट

तर मग कोर्टात जाईल :- महेश मांजरेकर

0

येत्या १८ ऑक्टोबरला ‘मी शिवाजी पार्क’ नावाचा महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. दिग्गज मराठी कलाकारांची फौज या सिनेमात अभिनय साकारत असण्याने चर्चा तर होणारच होती. मात्र सिनेमाची चर्चा आहे ती सेन्सॉर सर्टिफिकेटच्या वादामुळे. आक्षेपार्ह संवादामुळे कोर्टाचा अवमान होत असल्याचे कारण देत सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे असे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही योग्य उत्तर न मिळाल्यास शेवटचा पर्याय म्हणून कोर्टात जाईल असे मांजरेकर यांनी संगितले.चित्रपटात आक्षेपार्ह असे काही नाही त्यामुळे सवांद वगळण्याचा प्रश्नच येत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Loading...

या आधीही महेश मांजरेकर यांना ‘शिक्षणाच्या आईचा घो’ या चित्रपटाच्या नावामुळे एका वादाला सामोरे जावे लागले होते. याखेरीज ‘न्यूड’ ‘एस दुर्गा‘ अशा अनेक मराठी चित्रपट सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी संघर्ष करावा लागला होते.

मी शिवाजी पार्क’ मध्ये विक्रम गोखले,शिवाजी साटम, अशोक सराफ, सतीश आळेकर,दिलीप प्रभावळकर अशा दिग्गज कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. मात्र प्रदर्शनाच्या तारखेपूर्वी सेन्सॉरच्या कात्रीतून चित्रपटाची सुटका होणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Loading...

भीमा-कोरेगाव प्रकरणी अटक केलेल्या 5 कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत वाढ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Previous article

जगातला सर्वात महागडा शूज आहे विकायला, किंमत आहे तब्बल 1,23,26,05,000 रूपये

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *