Royal politicsटॉप पोस्ट

मेक्सिकोमध्ये ऐतिहासिक बदल; राष्ट्रपती निवडणुकीत पहिल्यांदाच डाव्या विचारसरणीच्या नेत्याचा विजय

0

मेक्सिको:-

सध्या जगभरात एक भाषा, एक धर्म आणि राष्ट्रवादाचे कडवे वारे वाहत असताना मेक्सिकोमध्ये झालेल्या निवडणूकीत डाव्या विचाराचे नेते अँडरिस मॅन्युएल लोपेज ओब्रॅडोर यांचा विजय ऐतिहासिक ठरतो. अँडरिस मॅन्युएल लोपेज ओब्रॅडोर यांनी मेक्सिकोमधील राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. मेक्सिकोमधील हा एक मोठा राजकीय ऐतिहासिक विजय आहे.

Loading...

कोण आहेत अँडरिस मॅन्युएल लोपेज ओब्रॅडोर-

लोपेज ओब्रॅडोर यांना या निवडणुकीत 53% मते मिळाले असून ते येत्या 1 डिसेंबर ला शपथ घेतील. यानंतर पुढील 6 वर्ष ते मेक्सिकोमध्ये सत्तेवर असतील. तर सत्तेत असलेल्या पीआरआय ला 15% मते मिळाली. लोपेज ओब्रॅडोर हे मेक्सिको सिटी चे माजी महापौर असून एम्लो या नावाने प्रसिद्ध आहेत. लोपेज ओब्रॅडोर हे असे नेते आहेत ज्याचा आतापर्यंत सत्तेत असलेल्या कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही.

1929 पासून हे दोनच पक्ष होते मेक्सिकोमध्ये सत्तेत-

मेक्सिकोमध्ये आतापर्यंत नॅशनल अॅक्शन पार्टी (पीएएन) आणि  इंस्टिट्यूशनल रेवोल्यूशनरी पार्टी (पीआरआय) या फक्त दोन प्रमुख पक्ष सत्तेत राहिले आहेत. 1929 पासून 2000 पर्यंत, पीआरआय पक्षाचे उमेदवार अध्यक्ष होते, तर 2000 ते 2012 पर्यंत पीएएन सत्तेत होता. त्यानंतर 2012 च्या निवडणुकीत पीआरआय पुन्हा देशात सत्तेवर आला होता. 1929 पासून दर सहा वर्षांनी मेक्सिकोमध्ये निवडणुका होतात.

लोपेज ओब्रॅडोर काय म्हणाले त्यांच्या भाषणात-

लोपेज ओब्रॅडोर यांनी विजयी झाल्यानंतर आपल्या भाषणात म्हणाले की, मेक्सिकोमध्ये शांतता निर्माण केली जाईल, अमेरिकेबरोबर नवीन संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केले जाईल. देशाच्या अंतर्गत बाजारपेठ बळकट करण्याबाबत लोपेझ ओब्रॅडोर म्हणाले की, जे काही आपण वापरत आणत असून, ते आपल्या देशाच्या बाजारपेठेत उत्पादित करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणूनच मेक्सिकोचे लोक आपल्या कुटुंबासोबतच मेक्सिकोमध्ये राहून काम करू शकतील.

ते असे देखील म्हणाले की, देशातील राजकीय कारणांमुळे सामाजिक आणि आर्थिक विषमता निर्माण झाली आहे, यामुळे हिंसा आणि भ्रष्टाचारच्या समस्या वाढत आहे.

लोपेज ओब्रॅडोर यांनी निवडणुकीच्या प्रचारात भ्रष्टाचाराला सर्वाधिक महत्त्व मुद्दा बनवून प्रचार केला होता. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पची यांच्यावर उघड टीका केली होती.

परंतू डोनाल्ड ट्रम्प यांनी लोपेज ओब्रॅडोर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Loading...

अफवांमुळे 5 जणांची हत्या, 23 जणांना अटक

Previous article

सर्वोच्च न्यायालयाच्या 23 न्यायाधीशांपैकी केवळ 12 न्यायाधीशांची संपत्ती जाहीर

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *