Royal politicsमुख्य बातम्या

MeToo :- कोण आहेत एम जे अकबर; ज्यांना लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर द्यावा लागला राजीनामा

0

महिला पत्रकार प्रिया रमाणी आणि तब्बल 19 महिलांनी केलेल्या लैंगिक अत्याचारच्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनी सरतेशेवटी आपल्या पदाचा राजीनामा दिला. #MeToo मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या आरोपांमुळे एम जे अकबर अत्यंत अडचणीत सापडले होते.

एम जे अकबर सरकारी कामानिम्मित नायजेरियामध्ये असताना महिला पत्रकार रमाणी यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

Loading...

एम जे अकबर एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाची घटना प्रिया रमाणी या पत्रकारानं धाडस दाखवत ट्विट्टरवर मांडली. अकबर नायजेरियातून परत आल्यावर त्यांनी आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप फेटाळत रमाणी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला. मात्र, रमाणी यांच्या मागे तब्बल 19 महिला उभ्या राहिल्या.

या बाकीच्या महिलांनी एम जे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. परंतू एम जे अकबर यांनी आता फक्त पत्रकार रमाणी यांच्यावर न्यायालयात मानहाणीचा दावा ठोकला आहे. परंतू बाकी महिलांनी केलेल्या आरोपांबद्दल एम जे अकबर यांनी काहीही बोलण्याचे टाळले आहे.

एम जे अकबर यांनी सरकारला एक स्टेटमेंट सादर केले आहे. त्यात त्यांनी थॅंक यू असे देखील म्हणले आहे आणि त्यात असे देखील म्हणले आहे की ते आपल्या क्षमतेने न्यायालयात केस लढवतील.

कोण आहेत एम जे अकबर – 

  • यांनी मिडियामध्ये देखील काम केले आहे. मिडिया मधील एक प्रसिद्ध व्यक्तिमहत्व आहे. या ही पेक्षा जास्त ते राजकरणात सक्रिय आहेत.
  • 1989 साली त्यांनी कॉंग्रेसमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, या काळात ते खासदार देखील होते.
  • 2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता झाले. 2016 मध्ये यांना केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री हे पद देण्यात आले.

Loading...

शिवसेनेचा दसरा मेळावा, काल-आज आणि उद्या…

Previous article

#MeToo मोहीम देशातील गंभीर मुद्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठी, नाना पाटेकारांवर देखील दिली प्रतिक्रिया

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *