ट्रेंडिंगभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्याराजकारण

#MeToo : उद्या मोदी तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार? : शक्ती कपूर

0

अभिनेते शक्ती कपूर यांनी #MeToo वर प्रतिक्रिया दिली आहे. शक्ती कपूर यांनी या मोहिमेवरच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकंच नव्हे तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हस्तक्षेप करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

‘#MeTooची बरीच प्रकरणं समोर येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करता कोर्टात जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याची बदनामी रोखावी. कलाकार असो, व्यावसायिक असो किंवा नेता असो, कोर्टात आरोप सिद्ध झाल्यावरच त्यांची नावं जाहीर करावी.

Loading...

आरोपांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यांचं पूर्ण करिअर संपतं. कुटुंबीयसुद्धा त्यांच्याकडे संशयाने पाहू लागतात. नोकरीवरून त्यांना हाकललं जातं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून याबाबत कायदा करावा. उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार?

Loading...

VIDEO- पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावनिक, मोदींना अश्रू अनावर

Previous article

संपूर्ण देशात फटाके वाजवण्याची मुदत फक्त रात्री 8-10, फटक्यांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी – सर्वोच्च न्यायालय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *