Royal politicsमुख्य बातम्या

#MeToo मोहीम देशातील गंभीर मुद्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठी, नाना पाटेकारांवर देखील दिली प्रतिक्रिया

0

#MeToo च्या वादळाला महाराष्ट्रातून सुरुवात झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच #MeToo महिमेबद्दल बोलले. #MeToo महिमेची सुरुवात देशातील इतर गंभीर मुद्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठी सुरू केली आहे, पेट्रोल-डिझेल च्या वाढणार्‍या किंमती, रुपयाची घसरण आणि बेरोजगारी या मुद्यांकडून लक्ष विचलित होत आहे.

जर महाराष्ट्र #MeToo सारखा प्रकार कोणत्याही महिलेबरोबर घडल्यास त्यांनी वेळ न दवडता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे यावे. आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ. ते या वेळी असे देखील म्हणाले की, जर कोणत्याही महिलेबाबत लैंगिक शोषणासारखा प्रकार घडला तर त्यांनी लगेचच त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. ना की 10 वर्षानंतर.

नाना पाटेकर याच्यावर असलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल काय बोलले राज ठाकरे – 

बॉलीवुडमध्ये #MeToo च्या आरोपांवरून नाना पाटेकर हे बरीच अडचणीत आले आहेत, तनुश्री दत्ताने नाना वर लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल विचारले असता ते म्हणाले. तो अभद्र माणूस आहे. असे प्रकार तो करत असतो, पण असा कोणता प्रकार करेल असा मला वाटत नाही. या प्रकारात न्यायालयच लक्ष घालेल.

Loading...

याआधी काही महिन्यांपूर्वी नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक देखील घडली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी नानांची महात्मा पाटेकर अशी देखील खिल्ली उडवली होती.


हे ही वाचा –

शिवसेनेचा दसरा मेळावा, काल-आज आणि उद्या…

MeToo :- कोण आहेत एम जे अकबर; ज्यांना लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर द्यावा लागला राजीनामा


 

Loading...

MeToo :- कोण आहेत एम जे अकबर; ज्यांना लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर द्यावा लागला राजीनामा

Previous article

तृप्ती देसाई यांना सबरीमाला मंदिराप्रकरणी मोदींना भेटण्यापासून रोखले, पुणे पोलिसांकडून अटक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *