Royal Entertainmentमुख्य बातम्या

मेथीच्या दाण्याचे आरोग्यदायी फायदे

0

गुणकारी असणारी ही मेथी शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. मेथीचे दाणे हे औषधी गुणांनी समृद्ध आहेत. आयुर्वेदामध्ये मेथीच्या दाण्यांचा वापर औषधासाठी केला जात होता.
यामध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह यासारखे अनेक पोषक तत्व असतात. आज आपण मेथीच्या दाण्यांचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते पाहणार आहोत.
मेथीच्या दाण्यामध्ये असलेली पोषक तत्व हृद्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मेथीच्यादाण्यांचे सेवन केल्याने हृदय चांगल्याप्रकारे काम करत आणि ब्लड क्लॉट होण्यापासून वाचवतं.
केसांमध्ये कोंडा होणे ही सर्वांची सामान्य समस्या आहे. कोंडा झाला असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणजे मेथीच्या दाण्याची पेस्ट. मेथीच्या दाण्याची पेस्ट करून ती डोक्याला लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर केस धुवा आणि हे केस सुती कापडाने पुसा. असे केल्याने कोंडा निघून जाईल.
मेथीची पाने मिक्सर मध्ये वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास, चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होते. तसंच त्वचेमध्ये तजेलदारपणा टिकून राहतो.
गॅस अथवा छातीत कफ झाला असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषध आहे. पाच ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग नाहीसा होतो.
वजन कमी करण्यासाठी आणि हार्मोन संतुलित राहण्यासाठी मेथीच्या दाण्याचे नियमित सेवन केल्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी अत्यंत लाभदायक आहे. मेथी दाणे वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत.
मेथी दाणे  मिक्सरमध्ये बारीक करून घ्या या पावडरमध्ये थोडंसं दही घालून जाड पेस्ट बनवा. तयार पेस्ट  आपल्या चेहऱ्याला लावा. अर्ध्या तासाने  ही पेस्ट हाताने चोळून  काढा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाईल. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
केस गळतीच्या समस्येवर मेथीच्या दाण्यांचा फार उपयोग होतो. मेथीचे दाणे नारळाच्या कोमट तेलामध्ये रात्रभर भिजवत ठेवा आणि सकाळी हे मिश्रण डोक्याला मसाज करा. असे केल्याने तुमची केस गळतीची समस्या नाहीशी होईल.
ज्यांना अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यासोबत घ्यावे. सकाळ संध्याकाळ हा उपाय केल्यास बद्धकोष्टतेची समस्या दूर होईल आणि अपचनाचा त्रास होणार नाही.
आपल्याला मेथीच्या दाण्याचे आरोग्यदायी फायदेही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

#HBD : कमल हासनच्या ‘या’ भूमिकांची आजही चाहत्यांना भूरळ

Previous article

मिठा सोबत करा हा एक उपाय ज्यामुळे खूप धनलाभ होईल..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.