Royal Entertainmentमुख्य बातम्या

#Metoo नाना पाटेकरसह तीन जणांवर गुन्हा दाखल, होणार का अटक?

0
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेले #Metoo चे वारे सध्या बॉलिवूड जगतात चांगलेच थैमान घालत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता .त्यानंतर सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती.

दरम्यान तनुश्रीने बुधवारी यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, तेथे येताना कोणी ओळखू नये, म्हणून तिने बुरखा घातला होता. तिच्या जबाबानंतर ओशिवारा पोलिसांनी नाना पाटेकर आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हॉर्न ओके प्लिज या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, चित्रपटाचे निर्माते सामी सिद्धीकी, चित्रपट दिग्दर्शक राकेश सारंग यांचा समावेश आहे.

तत्पुर्वी शूटिंग दरम्यान असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी सांगितले होते.त्याच प्रकारे हा सर्व प्रकार खोटा आहे असा कोणताही प्रकार चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान घडला नसल्याचे हॉर्न ओके प्लिज चे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे. नाना पाटेकर यांनी मात्र वकिलांनी यावर काहीही वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला असल्यामुळे बोलण्याचे टाळले. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर नाना पाटेकर आणि हॉर्न ओके प्लिज चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल –

  • या चौघांविरोधात ३५४ आणि ५०९ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • गुन्हा : स्त्रीच्या अंगावर जाणे, तिचा विनयभंग करणे, बळजबरी करणे
  • लैंगिक उद्देशाने महिलेची छेडछाड
  • कलमांतर्गत शिक्षेची तरतूद- 1 वर्षापर्यंत कैद आणि दंड
Loading...

(INPUT BY- अक्षय भुजबळ)

Loading...

‘तितली’चा धोका; ओडिशा आणि आंध्रप्रदेशातील 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

Previous article

आत्महत्या रोखण्यासाठी या देशाने केली मंत्र्याची नेमणूक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *